मुंबई: ओला कंपनीनं आपल्या कमी किंमतीतील कॅबच्या पॉलिसीमध्ये आता महागड्या कारचाही समावेश केला आहे. या महागड्या कारमध्ये BMW, जग्वार आणि मर्सडीज या कार आहेत. या कारमधून एक किमी फिरण्यासाठी अवघे 19 रुपये मोजावे लागणार आहे. तर 5 किमी फिरण्यासाठी 200 रु. मोजावे लागतील.

 

ओला कंपनीचे चीफ मार्केटिंग ऑफिसर रघुवेश सरुप यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कमी वयाच्या एंटरप्रायजेसची वाढती संख्या आणि युवकांची वाढती मागणी यामुळे आम्ही ही नवी सेवा सुरु केली आहे.'

 
ही सुविधा सध्या मुंबईत सुरु करण्यात आली आहे. मुंबई लोकेशन अॅप सुरु केल्यानंतर ग्राहकांना Lux आयकोन पाहायला मिळणार आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर लग्जरी कार अवघ्या काही वेळात मिळू शकते.

 
याआधी ऊबरने दिल्लीमध्ये “Uber Supercars” कॅम्पेन सुरु झालं. ज्यामध्ये ऑडी, हमर यासारख्या कारनं ग्राहकांना फ्री राईड देण्यात आली होती.