मुंबई : आपल्याकडे वेअरेबल स्मार्टफोन असावा, अशी एखादी कल्पना तुमच्या डोक्यात असेल, तर तुमची कल्पना प्रत्यक्षात उतरणार आहे. लवकरच वेअरेबल स्मार्टफोन बाजारात येणार आहे. चीनमधील मॉक्सी या स्टार्टअप ग्रुपने दावा केला आहे की, ते जगातील पहिला वेअरेबल स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.
मॉक्सी कंपनीच्या माहितीनुसार, यंदा डिसेंबर महिन्यापर्यंत फोल्डेबल मोबाईल लॉन्च केलं जाणार असून, या स्मार्टफोनची किंमत जवळपास 5 हजार युआन (जवळपास 51 हजार रुपये) असेल. हा स्मार्टफोन ग्राहक आपल्या मनगटात घालू शकतात.
कंपनीने प्रसिद्ध केलेल्या फोटोंनुसार, हे डिव्हाईस हातातल्या घड्याळासारखं दिसतं. शिवाय, पूर्णपणे लवचिक आहे. यूझर्स आपल्या मनगटावर ब्रेसलेटप्रमाणे हे डिव्हाईस बांधू शकतात.
मॉक्सी कंपनीच्या जाहिरातीत दाखवलेल्या मॉडेलपेक्षा प्रत्यक्षातील डिव्हाईस वेगळा असण्याची शक्यताही आहे. या मॉडेलचं पहिलं व्हर्जन काळा आणि पांढऱ्या रंगाच्या स्क्रीनमधील असेल. कारण, कमी बॅटरी क्षमतेमध्ये मोबाईल काम करु शकेल.