नवी दिल्ली: अॅप आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या ओला या कंपनीने 'Taxi for Sure' सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा ओलाने 18 महिन्यांपूर्वी 20 कोटी डॉलरच्या गुंतवणुकीने सुरु केली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या या निर्णयामुळे 700 जणांच्या रोजगारावर गदा येणार आहे.


 

ओलाची 'Taxi for Sure' ही सेवा ग्राहकांसाठी कमी खर्चात सेवा पुरवणारा ब्रॅण्ड ठरला होता. ओलाने अमेरिकन कंपनी उबरला टक्कर देण्यासाठी ही सेवा मार्च 2015 मध्ये 20 कोटी डॉलरच्या गुंतवणुकीने सुरु केली होती. मात्र, नंतर या सेवेचा वापर कमी करून कंपनीने ड्रायव्हर, सहकारी आणि ग्राहकांना एकाच व्यासपीठावर आणले आहे.

 

दरम्यान, ओलाने या वर्षीच्या सुरुवातीला सर्वात स्वस्त अशी 'मायक्रो' ही टॅक्सी सेवा सुरु केली आहे. ही सेवा सध्या 90 शहरांमध्ये कार्यन्वित आहे. तर ओलाने कमी खर्चाची कॅब सेवेच्या नावावर आपली प्राईम सेवा लाँच केली आहे. ज्याने बाजारपेठेतील आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.