वॉशिंग्टन: गूगलच्या सहाव्या 'गूगल सायन्स फेअर 2016 स्पर्धे'च्या अंतिम फेरीत दोन भारतीयांसह चार भारतीय वंशाच्या मुलांनी धडक मारली आहे. या स्पर्धेसाठी 16 स्पर्धकांनी सहभाग घेतला असून, या स्पर्धेतील विजेत्यांना 50 हजार अमेरिकन डॉलर शिष्यवृत्ती मिळणार आहे.
या स्पर्धेसाठी हैदराबादच्या वासवानी इंटरनॅशनल स्कूलच्या 15 वर्षीय फातिमाने जलाशयातील पाण्याचा शेतीसाठी वापर करताना, त्यावर नियंत्रण ठेवणारी प्रणाली विकसित केली आहे.
तर बंगळुरूच्या इंदिरानगर नॅशनल पब्लिक स्कूलमधील दहावीतील श्रीआंकने 'कीपटेब' नावाचे एक उपकरण बनवले आहे. हे उपकरण धारण केल्याने, त्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील नित्यक्रमाला संकलित करता येणार आहेत.
या स्पर्धेत चार भारतीय वंशाच्या अमेरिकेतील अनिका चिरला (14), अनुष्का नाइकनवारे (13), निखिल गोपाल आणि निशिता बेलूर (13) यांचा सामावेश आहे.
न्यू जर्सीतील भारतीय वंशाच्या 15 वर्षीय निखिल गोपलच्या 'पॉईंट ऑफ केअर टेस्टिंग फॉर मलेरिया यूजिंग ए स्मार्टफोन अॅन्ड मायक्रोफ्लइडिकई एलआयएसए' या उपकरणासाठी त्याची अंतिम फेरीत निवड झाली आहे. 'गूगल सायन्स फेअर' एक वैश्विक ऑनलाइन विज्ञान आणि तंत्रज्ञान स्पर्धा आहे. या स्पर्धेत 13 ते 18 वर्षापर्यंतचे विद्यार्थी किंवा त्यांचा संघ सहभागी होऊ शकतो.