महान शास्त्रज्ञ निकोला टेस्ला यांनी अनेक महत्त्वपूर्ण शोध लावले. आज आपली घरं उजळवणाऱ्या प्रकाशाचा शोध निकोला टेस्ला यांनी लावला होता. टेस्लाला 'पृथ्वीला प्रकाशाने सजवणारा मनुष्य' असेही म्हणतात. टेस्ला यांचे शोध आइनस्टाइन आणि एडिसन यांच्यापेक्षा कमी नव्हते. आज प्रत्येकला ड्रोन माहिती आहे. मात्र, ड्रोनचा वापर सर्वात आधी कुठे आणि कोणत्या स्वरूपात केला हे माहित आहे का? ड्रोन हे खरं तर एक यंत्र आहे जे रोबोट सारखे कार्य करते ज्याचा ताबा माणसाच्या हातात असतो. या ड्रोनच्या अविष्काराच्या मागेही महान शास्त्रज्ञ निकोला टेस्ला यांची प्रेरणा आहे. आज निकोला टेस्लाचा वाढदिवस आहे, निकोला टेस्लाचा जन्म 10 जुलै 1856 रोजी क्रोएशियामध्ये झाला होता. या निमित्ताने आज आपण ड्रोन अविष्कारात त्यांची काय प्रेरणा आहे? हे जाणून घेऊ. 


ड्रोनचा इतिहास दोन दशक जुना आहे. इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञानातील प्रगतीमुळेच ड्रोनचा शोध शक्य झाला. ड्रोन्सची शक्ती सर्वप्रथम 1973 च्या योम कुप्पूरमध्ये आणि 1982 मध्ये लेबानान युद्धामध्ये जाणवली. यानंतर अनेक देशांच्या सैन्याने ड्रोनचा वापर करण्यास सुरुवात केली. सुरक्षा संबंधित संस्था ड्रोनच्या मदतीने पाळत ठेवण्याचे काम सहज करू शकतात. ड्रोनचा वापर भारतातही मोठा आहे. इस्राईलकडून भारताने 200 हून अधिक ड्रोन सेवा घेतल्या आहेत.


सामान्य नागरिकांच्या वापरासाठी ड्रोनवर भारतात बंदी आहे. युद्धात सर्वप्रथम ड्रोनचा वापर करण्यात आला. 1849 मध्ये ऑस्ट्रियाने मानव रहित बॉम्ब फेकण्याचे यंत्र बनविले. जे मानव रहित उडणारे होते. हे बलूनसारखे दिसत होते. असं म्हटलं जातं की येथूनच ड्रोन बनविण्याची प्रेरणा मिळाली. यानंतर, 1915 मध्ये महान शास्त्रज्ञ निकोला टेस्ला यांनी एक लढाऊ विमान बनवले जे मानव रहित होते. हे आधुनिक ड्रोनचा आधार असल्याचे मानले जाते. दुसर्‍या महायुद्धात अमेरिकेने मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर केला. ते तयार करण्यात मर्लिन मनरो नावाच्या व्यक्तीची मोलाची भूमिका होती.


यानंतर विविध क्षेत्रात ड्रोनचा वापर सुरू झाला. 1987 पासून ड्रोनचा उपयोग शेतीविषयक कामांसाठी केला जात आहे. सैन्याबरोबरच पोलिस, वन विभाग, मीडिया, समुद्रशास्त्र आणि चित्रपट निर्मिती इत्यादींमध्येही ड्रोनचा वापर केला जात आहे. भविष्यात ड्रोनचा ट्रेंड व्यापक होणार आहे, या दिशेने नवे प्रयोग सुरू आहेत.