प्रीमियम स्मार्टफोनची लोकप्रिय कंपनी वनप्लस (OnePlus) लवकरच भारतात OnePlus Nord 2 5G हा नवीन फोन बाजारात आणणार आहे. माहितीनुसार हा फोन मिड रेंजमध्ये लेटेस्ट फीचर्ससह असेल. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 1200-एआय सीओ प्रोसेसरसह लॉन्च केला जाईल. या प्रोसेसरसह येणारा वनप्लसचा हा पहिला फोन असेल. OnePlus Nord 2 5G फोनची फीचर्स जाणून घेऊया.


OnePlus Nord 2 5G ची फीचर्स काय असू शकतात?


वनप्लस नॉर्ड 2 5 जी मध्ये 6.43-इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 12 जीबी रॅम आणि 128 जीबी 256 इंटरनल स्टोरेज अशा दोन प्रकारांसह लॉन्च होईल. फोनमध्ये 4500mAh बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच सिक्युरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरदेखील दिला जाऊ शकतो.
  
फोनचा कॅमेरा कसा असू शकतो? 


वनप्लस नॉर्ड 2 5 जी मध्ये उत्तम क्वालिटीचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. यात एआय व्हिडिओ एन्केसमेंट फीचर दिलं जाऊ शकतं. ज्यामध्ये रेकॉर्डिंगच्या वेळी एचडीआर इफेक्ट सुरु होईल. यामुळे कॅमेर्‍याचे इफेक्ट चांगले मिळतील. यात ट्रिपल रीअर कॅमेरा दिला जाऊ शकतो.


OnePlus आणि Oppo कंपन्यांचं विलीनीकरण


 चीनची लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी वनप्लस (OnePlus) आणि ओप्पो (Oppo) या कंपन्या विलीन झाल्या आहेत. त्यानंतर वनप्लस आता ओप्पोची सब-ब्रँड बनली आहे. या दोन्ही कंपन्या BBK इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत येतात. अधिकाधिक संसाधने एकत्रित करण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. या विलीनीकरणानंतरही, वनप्लस स्वतंत्रपणे कार्य करत राहील आणि ब्रँड नाव देखील सुरू राहील. परंतु दोन्ही कंपन्या एकमेकांशी रिसोर्सेस आणि टीम शेअर करतील. यापूर्वीही या कंपन्या एकत्र काम करत आल्या आहेत.