Moto S30 Pro Launch Date: Motorola 2 ऑगस्ट रोजी Moto Razr 3 आणि Moto X30 Pro लॉन्च करणार आहे. एका कार्यक्रमात हा हे स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार असून हा कार्यक्रम चीनमध्ये होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी आणखी एक नवीन स्मार्टफोन Moto S30 Pro लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा फोन 2 ऑगस्टला लॉन्च होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी Moto S30 Pro चे फीचर्स मीडिया रिपोर्ट्स द्वारे लीक झाले आहेत. Moto S30 Pro फोनमध्ये 4,270 mAh बॅटरी देऊ शकतो. यासोबतच 68 W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो. 


मिळू शकतात हे फीचर्स 



  • Moto S30 Pro फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888+ ऑक्टा कोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

  • Moto S30 Pro फोनच्या 6.55-इंचाच्या स्क्रीनवर OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. 

  • फोनमध्ये 1,080 x 2,040 पिक्सेलचे रिझोल्यूशन मिळू शकते. या फोनमध्ये 120 HZ चा रिफ्रेश रेट असू शकतो.

  • Motorola चा Moto S30 Pro फोन मध्ये 4,270 mAh ची बॅटरी दिली जाऊ शते. यासोबतच 68 W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो.

  • रॅम आणि मेमरीबद्दल बोलायचे झाल्यास, Moto S30 Pro फोन 8 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेज, 12 जीबी रॅम + 256 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 16 जीबी रॅम + 512 जीबी इंटरनल स्टोरेजच्या 3 प्रकारांसह लॉन्च केला जाऊ शकतो.

  • Moto S30 Pro फोन ड्युअल किंवा ट्रिपल कॅमेरा सेटअप सह येऊ शकतो. मात्र फोनच्या कॅमेऱ्याबाबत अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. असा अंदाज आहे की, कॅमेरा 8K व्हिडीओ फॉरमॅटला सपोर्ट करू शकतो.

  • Moto S30 Pro फोन Android 12 सह लॉन्च केला जाऊ शकतो.

  • कंपनी Moto S30 Pro फोन ब्लॅक, गोल्ड, ब्लू, व्हाईट, सियान, रेड, सिल्व्हर आणि ग्रे कलरमध्ये लॉन्च करू शकते.

  • Moto S30 Pro फोनचे वजन 170 ग्रॅम असू शकते. याशिवाय यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही मिळू शकतो.


दरम्यान, बातमीत सांगितलेले हे सर्व फीचर्स मीडिया रिपोर्ट्सद्वारे सांगण्यात आले आहेत. कंपनीने या फोनबद्दल आणि त्याच्या फीचर्सबद्दल कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही.


महत्वाच्या बातम्या :