Vivo Y35 Launch Date : Vivo ग्राहकांसाठी खुशखबर ! Vivo कंपनी लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन Vivo Y35 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मात्र, या स्मार्टफोनच्या लॉन्च होण्यापूर्वीचे याचे काही फिचर्स लीक झाले आहेत. असं म्हणतात की, Vivo Y35    स्मार्टफोनमध्ये 6.58 इंच स्क्रीनवरून फुल एचडी + डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यामध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देखील मिळू शकतो. याशिवाय स्मार्टफोनमध्ये 60 HZ चा रिफ्रेश रेट देखील दिला जाऊ शकतो. Vivo Y35 स्मार्टफोन ब्लॅक आणि गोल्ड कलर सह लॉन्च केला जाऊ शकतो. या फोनच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल जाणून घ्या. 


Vivo Y35 चे काही फिचर्स : 



  • Vivo Y35 स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर देऊ शकतो.

  • 6.58 इंच स्क्रीनवरून Vivo Y35 स्मार्टफोनमध्ये फुल एचडी + डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यामध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देखील मिळू शकतो. याशिवाय फोनमध्ये 60 HZ चा रिफ्रेश रेट देखील दिला जाऊ शकतो.

  • Vivo Y35 स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह बाजारात येऊ शकतो. कंपनी फ्लॅशलाइटसह 50 MP मेन बॅक कॅमेरा, 2 MP दुसरा आणि 2 MP तिसरा कॅमेरा ठेवू शकते.

  • सेल्फीसाठी Vivo Y35 स्मार्टफोनमध्ये 16 MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

  • रॅम आणि इंटरनल स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर Vivo Y35 स्मार्टफोन मध्ये 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते. तसेच मेमरी कार्डद्वारे एक्सटर्नल मेमरीचा पर्यायही उपलब्ध होऊ शकतो.

  • Vivo चा Vivo Y35 स्मार्टफोन Android 12 सह येऊ शकतो.

  • Vivo Y35 मध्ये 5,000 mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. ते चार्ज करण्यासाठी एकाच वेळी 10 W चा चार्जर दिला जाऊ शकतो.

  • Vivo Y35 स्मार्टफोन 4G नेटवर्कसह बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो.

  • Vivo Y35 स्मार्टफोन ब्लॅक आणि गोल्ड कलर सह सादर केला जाऊ शकतो.

  • Vivo Y35 स्मार्टफोनचे वजन 188 ग्रॅम असण्याचा अंदाज आहे.

  • Vivo Y35 स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम, 3.5 मिमी जॅक, वाय-फाय आणि ब्लूटूथ 5.1 सारखी सर्व वैशिष्ट्ये असण्याची अपेक्षा आहे.


महत्वाच्या बातम्या :