एक्स्प्लोर
मोटो G6 चा फोटो लीक, फीचर्सबाबत उत्सुकता
मोटोरोलाचा मच अवेटेड फोन मोटो G6 बाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. G सीरिजच्या यशानंतर नव्या फोनविषयी मोठी उत्सुकता आहे.
मुंबई : अनेक कंपन्यांनी 2018 मध्ये लाँच होणाऱ्या फोनच्या फीचर्सबाबत माहिती दिली आहे. मात्र मोटोरोलाचा मच अवेटेड फोन मोटो G6 बाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. G सीरिजच्या यशानंतर नव्या फोनविषयी मोठी उत्सुकता आहे.
मोटो G6 चा नुकताच एक फोटो समोर आला आहे. हा फोटो समोर ठेवत जाणकार विविध तर्क-वितर्क लावत आहेत. काहींच्या मते, मोटो G6 चे दोन व्हेरिएंट्स असू शकतात. मोटो G6 आणि मोटो G6 प्ले असेल दोन व्हेरिएंट असण्याची शक्यता आहे.
मोटो G6 प्लेची विशेषता म्हणजे या फोनचा डिस्प्ले 5.7 इंच आकाराचा असेल. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 430 1.4GHz ऑक्टाकोअर प्रोसेसर असेल. तर 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि रॅपिड फोकस टेक्नीक असेल. तर 4000mAh क्षमतेची बॅटरी असण्याची शक्यता आहे.
मोटो G6 मध्येही 5.7 इंच आकाराची स्क्रीन असेल. मात्र मोटो G6 प्लेच्या तुलनेत या फोनचा प्रोसेसर वेगळा असेल. यामध्ये स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर देण्यात आलं आहे. तर 3 किंवा 4 GB ची रॅम आणि 32 किंवा 64GB स्टोरेज असू शकतं. या दोन्ही फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement