Happy Mahashivratri 2022 Wishes : महाशिवरात्रीचा (Mahashivratri 2022) उत्सव जवळ आला आहे. अशा वेळी आपल्या प्रियजनांना, कुटुंबियांना, मित्र मैत्रिणींना तुम्हाला शुभेच्छा पाठवायच्या असतील. पण, यासाठी एक साधा मेसेज लिहिणे फार कंटाळवाणे वाटते. या सगळ्यापासून ही प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे काही छान महाशिवरात्रीचे स्टिकर्स पाठवू शकता. काही सोप्या पद्धतीनुसार तुमच्या मोबाईलवरून शुभेच्छा संदेशाचे स्टिकर्स कसे तयार करायचे, ते कसे डाऊनलोड करायचे आणि पाठवायचे याबद्दल आम्ही तुम्हाला सांंगणार आहोत.
महाशिरात्री स्टिकर पॅक इन्स्टॉल करा
गुगल प्ले स्टोअरमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी अनेक स्टिकर पॅक आहेत. फक्त तुमच्या मोबाईलवर प्ले स्टोअर ओपन करा आणि " Mahashivratri2022 WhatsApp Stickers" शोधा. यापैकी एक अॅप इन्स्टॉल करा. अॅप ओपन केल्यानंतर स्टिकर पॅक सेट करण्यासाठी ऑन-स्क्रीन सूचना फॉलो करा. जेणेकरून ते WhatsApp वर उपलब्ध होतील. बर्याच अॅप्समध्ये अनेक स्टिकर पॅक असतील ज्यात स्टील आणि अॅनिमेटेड दोन्ही स्टिकर्स समाविष्ट असतात. तुम्हाला हवे असलेले पॅक निवडा आणि ते WhatsApp वर कनेक्ट करा.
WhatsApp वर स्टिकर्स कसे पाठवायचे ?
WhatsApp उघडा आणि तुम्हाला जिथे स्टिकर्स पाठवायचे आहेत त्या पर्सनल चॅट किंवा ग्रुप चॅटवर नेव्हिगेट करा. इमोजी बटण ओपन करा आणि उजवीकडे स्टिकर्स टॅबवर जा. येथे, तुम्हाला अनेक स्टिकर पॅक दिसतील, जे तुम्ही पहिल्या स्टेपमध्ये कनेक्ट केले होते
तो विशिष्ट स्टिकर पॅक उघडण्यासाठी, स्टिकर पॅक हेडरवर टॅब करा आणि तुम्हाला कोणते स्टिकर पाठवायचे आहे ते निवडण्यासाठी स्क्रोल करा. तुम्हाला कोणते स्टिकर्स पाठवायचे हे कळल्यावर त्यावर टॅप करा आणि पाठवा. येथे नमूद केलेल्या चरणांचा वापर करून तुम्ही होळीसह इतर कोणत्याही सणासाठी स्टिकर्स देखील जोडू शकता.
महत्वाच्या बातम्या :
- Mahashivratri 2022 : महाशिवरात्रीला रात्रीच्या पूजेचे विशेष महत्त्व, 'या' मंत्राचे करा पठण
- Maha Shivratri 2022 : 'हर हर महादेव' ; जाणून घ्या महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त अन् पूजा विधी
- Important Days in March 2022 : मार्च महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha