नवनवी सोशल प्लॅटफॉर्म्स ही युजर्सला आकर्षित करताना दिसून येत आहेत. भारत सरकारने टिकटॉक, हेलोसह 59 चिनी मोबाईल apps बंदी घातली आहे, याच पार्श्वभूमीवर टिकटॉक युजर्सने वाट धरली आहे ती चिंगारी app ची.


गुगल प्ले स्टोअर वर धूम...


सध्या चिंगारी app चे तासाला 1 लाखांहून अधिक डाऊनलोड्स हे होत आहेत तर आत्तापर्यंत एकूण 50 लाखाहून आधिक डाऊनलोड केलं गेलं आहे.


चिंगारी हे गुगल प्ले स्टोअर वर नोव्हेंबर 2018 ला Android युजर्ससाठी तर जानेवारी 2019 ला iOS साठी लॉंच झालं.


हे App बँगलोरच्या प्रोग्रामर्स बिस्वात्मा नायक आणि सिद्धार्थ गौतम यांनी बनवलं आहे शिवाय चिंगारी app चे व्ह्यूज दर अर्ध्या तासाला 10 लाखानं वाढत आहेत.


सरकारच्या बंदीनंतर गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरुन TikTok अॅप हटवलं!


नऊ भाषांमध्ये उपलब्ध...!


चिंगारी एप इंग्रजीसह 9 भाषांमध्ये उपलब्ध आहे.. हिंदी, बांग्ला, गुजराती, मराठी, कन्नड, पंजाबी, मल्याळम, तमिळ आणि तेलगूतही व्हिडीओ करणं शक्य आहे.


यामुळे सर्वर क्रॅश होण्याची भीती चिंगारीचे सह संपादक सुमित घोष यांनी वर्तवली आहे. स्मार्टफोन युजर्सना सबुरीनं घेण्याचा सल्ला दिलाय.


कसं काम करतं चिंगारी?


काहीसं टिक टॉक सारखीच युजर इंटरफेस आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये व्हिडीओ अपलोड करण्यासोबतच चॅटिंग, नव्या लोकांशी बातचित, व्हीडिओ, ऑडिओ, स्टिकर्स, GIF सोबत क्रिएटिव्हिटी केली जाऊ शकते.


गुगल प्ले वर ट्रेंडींग टॉप Applications मध्ये या चिंगारी ने स्थान मिळवलं आहे. चिंगारी app ला मिळणारा प्रतिसाद पाहता आता या app मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा गुंतवणूकदार उत्सुक असल्याने त्यानंतर अधिक चांगल्या प्रकारे हे app सुंदर करता येऊ शकेल असं या app च्या डेव्हलपर्स ने सांगितलं. चिंगारीने हा वणवा पेटवला असला तरी या माध्यमातून पुन्हा क्रियेटर्स चांगल्या आणि कलागुणांना वाव देणासाठी वापर करतील का हे बघणं महत्त्वाचे ठरेल.


Chinese app TikTok ban होने पर क्या बोले उसके जरिए फेमस हुए लोग?