नवी दिल्ली : 31 मार्चनंतर जिओच्या युझर्सना मोफत सेवेसाठी पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, जिओच्या नव्या प्लॅननुसार एप्रिल ते जून या महिन्यांदरम्यान मोफत सेवेसाठी अधिकचे 100 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे.


रिलायन्स जिओचे यूझर्स सध्या मोफत सेवा मिळत आहे. यामध्ये यूझर्सना मोफत व्हॉईस कॉल आणि मोफत 4G डेटा मिळत आहे. याच महिन्यात रिलायन्स जिओ कंपनीने आपल्या वेलकम ऑफरची कालमर्यादा वाढवली. ‘हॅप्पी न्यू ईयर’ नाव दिलं आणि मार्च 2017 पर्यंत मोफत सेवेची ऑफर सुरु ठेवली आहे.

आता या सर्व बाबतीत अपडेट अशी आहे की, रिलायन्स जिओ आता एका नव्या टेरिफ प्लॅनवर काम करत असून, देशातील सर्वात स्वस्त टेलिकॉम ऑपरेटर बनवणार आहे.

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, रिलायन्स जिओ कंपनी नव्या टेरिफ प्लॅनवर अत्यंत वेगाने काम करत असून, आपल्या मोफत सेवेला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची शक्यता आहे. नव्या प्लॅननुसार जिओ सेवेसाठी यूझर्सना 100 रुपये भरावे लागू शकतात. यासोबत एप्रिल ते जून महिन्यांदरम्यान यूझर्सना मोफत डेटा आणि मोफत कॉलसाठी 10 रुपये चार्ज करु शकते.

टेलिकॉम रेग्युलेटर ‘ट्राय’ने भारताचे अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी मुकेश अंबानींच्या कंपनीकडून जिओच्या मोफत डेटा आणि मोफत कॉलिंग ऑफरवर स्पष्टीकरण मागवलं आहे. 90 दिवसांच्या वेलकम ऑफरनंतर ‘हॅप्पी न्यू ईयर’ ऑफरद्वारे मोफत कॉल आणि डेटा देण्याची घोषणा झाल्यानंतर ‘ट्राय’ने हे उचलले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजची टेलिकॉम सेवा पुरवणारी रिलायन्स जिओ कंपनीने चार महिन्यात 7.24 कोटी ग्राहकांना जोडण्याचा विक्रम केला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ग्राहकांच्या या संख्येत वेगाने वाढ होत आहे. सुरुवातीच्या दिवसात रिलायन्स जिओ कंपनी 6 लाख ग्राहक रोज जोडत होती. येत्या मार्च महिन्यापर्यंत जिओच्या ग्राहकांचा संख्या 10 कोटींच्या जवळपास आहे.