मुंबई : एचएमडी ग्लोबलने पहिला नोकिया स्मार्टफोन 'नोकिया 6' चीनमधील JD.com या ई-कॉमर्स वेबसाईटवर फ्लॅश सेल केला. यात जवळपास एका मिनिटात 'नोकिया 6' स्मार्टफोन सोल्ड आऊट झाला. या स्मार्टफोनसाठी लाखोंच्या घरात नोंदणी करण्यात आली होती.


चिनी वेबसाईट Anzhuo.cn च्या वृत्तानुसार, जवळपास एका मिनिटात 'नोकिया 6' स्मार्टफोनचे सर्व यूनिट विकले गेले. 'नोकिया 6' स्मार्टफोनची 24 तासात 2 लाख 50 हजार जणांनी नोंदणी केली होती. नोकियाने हा स्मार्टफोन सध्या चीनमधील बाजारपेठेतच लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 1699 युआन म्हणजेच भारतीय रुपयांत जवळपास 16 हजार 750 रुपये एवढी आहे.

'नोकिया 6'चे फीचर्स -

- 5.5 इंचाचा स्क्रीन (1080×1920 पिक्सेल रिझॉल्युशन)
- 2.5D आणि गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन
- अँड्रॉईड 7.0 नोगट
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट प्रोसेसर
- 4 जीबी रॅम
- 64 जीबी स्टोरेज
- 128 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा
- ड्यअल सिम
- 3000mAh  क्षमतेची बॅटरी
- 16 मेगापिक्सेल बॅक कॅमेरा
- 8 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा

अॅल्युमिनियम बॉडीपासून बनलेल्या 'नोकिया 6' स्मार्टफोनच्या होम बटनमध्येच फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. उत्तम साऊंडसाठी डॉल्बी एटमॉस टेक आणि ड्युअल एम्पलिफायर देण्यात आले आहे.