Jio Recharge Plan : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओने (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक खास प्लॅन आणला आहे, जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवस नाही तर संपूर्ण 30 आणि 31 दिवस म्हणजेच एक महिन्याची वॅलिडीटी (Validity) मिळणार आहे. हा जिओचा नवीन प्लान कोणता आहे जाणून घ्या.


फक्त 259 रुपये खर्च करावे लागतील


रिलायन्स जिओच्या या प्रीपेड प्लानमध्ये यूजर्सना फक्त 259 रुपये खर्च करावे लागतील. हा कॅलेंडर महिन्याच्या तारखेनुसार हा रिचार्ज प्लान आहे.


दररोज 1.5 GB डेटा मिळेल


Jio ही पहिली टेलिकॉम कंपनी आहे जी कॅलेंडर महिन्याच्या वॅलिडीटीनुसार प्रीपेड प्लॅन घेऊन आली आहे. जिओच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, 259 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये 1.5 जीबी दररोज डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सुविधा आहेत. याची वॅलिडीटी संपूर्ण कॅलेंडर महिन्यासाठी आहे. 


एका वर्षात मिळणार 12 रिचार्ज


कंपनीने सांगितले की, या प्लानमध्ये ग्राहकांना वर्षभरात 12 वेळा रिचार्ज करावे लागतील. याशिवाय, ज्या तारखेला पहिले रिचार्ज केले होते त्याच तारखेला दर महिन्याला प्लॅनची ​​पुनरावृत्ती होते. या वर्षाच्या सुरुवातीला, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने दूरसंचार कंपन्यांना 30 दिवसांच्या वॅलिडीटीसह प्रीपेड मोबाईल रिचार्ज स्किम ऑफर करण्यास सांगितले होते.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha