Netflix : बर्‍याचदा नेटफ्लिक्स किंवा इतर सशुल्क OTT प्लॅटफॉर्मवर, तुम्ही किंवा तुमचे मित्र एकमेकांचे लॉग इन आयडी आणि पासवर्ड शेअर करता आणि एकच खाते अनेक उपकरणांवर विनामूल्य चालवून वापरता. मात्र भविष्यात असे करणे शक्य होणार नाही. नेटफिक्स कंपनी आता पासवर्ड शेअरिंग थांबवण्यासाठी एका खास फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या फीचरवर काम सुरु असून त्याची चाचणी सध्या सुरू आहे. हे नवीन फिचर कंपनी लवकरच सुरु करण्याची शक्यता आहे.


कंपनीच्या आर्थिक उलाढालीवर परिणाम
नेटफ्लिक्स कंपनीने म्हटले आहे की सध्या मोठ्या संख्येने लोक सदस्यत्व घेतात आणि त्यांचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड मित्र किंवा कुटुंबीयांसोबत शेअर करतात. यामुळे कंपनीच्या महसुलावर मोठा परिणाम होत आहे. एवढेच नाही तर कंपनीच्या मूळ कंटेंटवरही त्याचा परिणाम होतो. यासाठी युजर्सनी असे करणे टाळावे.


'हे' आहे फिचर
मिळालेल्या अहवालानुसार, नेटफ्लिक्स एका सदस्यत्वावर (Membership) एकापेक्षा अधिक लाग इन रोखण्यासाठी 'अतिरिक्त सदस्य' (Extra Member) नावाचे फिचर आणणार आहे. यामुळे ज्या लोकांनी सदस्यत्व घेतले आहे ते त्यांच्या आयडीमध्ये फक्त दोन अतिरिक्त सदस्य (कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त) जोडू शकतील. इतकेच नाही तर कनेक्ट केल्यानंतरही तुम्हाला या सेवेसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतील. त्यामुळे पासवर्ड शेअरिंग यापुढे मोफत असणार नाही. कंपनी प्रत्येक सदस्याकडून त्याचे पैसे घेईल. या फीचरची चाचणी सध्या सुरू आहे. हे फीचर लवकरच लाँच होणार असल्याचे मानले जात आहे. मात्र, भारतात ते सुरू होण्यास थोडा वेळ लागेल, असेही सांगण्यात येत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha