Craftsart Cartoon Photo Tools : गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) एक धोकादायक अँड्रॉईड अ‍ॅप (Android App) सापडले असून, ते युजर्सचा फेसबुक डेटा चोरत असल्याचे आढळून आले आहे. तुमचे फोटो कार्टूनमध्ये बदलणाऱ्या हे धोकादायक अ‍ॅपला Craftsart Cartoon Photo Tools आहे. हे अ‍ॅप युजर्सना त्यांचे Facebook लॉगिन वापरण्याची परवानगी घेऊन डेटा चोरतो. Google Play Store ने या अ‍ॅपवर बंदी घातली आहे, परंतु ते तुमच्या फोनमध्ये अद्यापदेखील असू शकते. हे अ‍ॅप प्ले स्टोअरवरून एक लाखाहून अधिक वेळा इन्स्टॉल करण्यात आले आहे.


'हे' अ‍ॅप कसे कार्य करते
अँड्रॉइड मालवेअरने भरलेले हे अ‍ॅप युजर्सना फोटो अपलोड करून ते कार्टूनमध्ये बदलून देते. या अ‍ॅपमध्ये Facestealer नावाचे ट्रोजन (मालवेअर) लपलेले आहे. सुरक्षा संशोधक आणि मोबाइल सुरक्षा फर्म Pradeo ने ही माहिती दिली आहे. अहवालात म्हटले आहे की, अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर, युजर्सना ते वापरण्यासाठी फेसबुकमध्ये साइन इन करावे लागेल.


मात्र, त्यात लपवलेले स्पायवेअर प्ले स्टोअरच्या सुरक्षा तपासणीलाही बायपास करते. जेव्हा युजर्स Facebook मध्ये साइन इन करतात तेव्हा मालवेअर लॉगिन क्रेडेन्शियल्स फसवणूक करणाऱ्यांना फॉरवर्ड करू शकतात. अशा प्रकारे ते वापरकर्त्यांच्या फेसबुक खात्यावर पूर्ण नियंत्रण मिळवतात. परिणामी, हॅकर्स तुमच्या प्रोफाइलचा वापर कोणत्याही चुकीच्या कामासाठी करू शकतात.


युजर्सने काय करावे?



  • तुम्हीही फोनमध्ये हे अ‍ॅप डाऊनलोड केले असेल तर लगेच डिलीट करा.

  • प्ले स्टोअरवरून कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करत असताना त्याचे रिव्ह्यू नक्की वाचा.

  • तुमचे Facebook किंवा बँक खाते तपशील कोणत्याही अनधिकृत अ‍ॅपसोबत शेअर करू नका.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha