लंडन: टाटा उद्योग समुहाच्या मालकीची असणारी जाग्वार कंपनीने 2025 सालापासून केवळ इलेक्ट्रिक कार निर्मीती करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यासाठीच्या आवश्यक तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी 3.5 बिलियन डॉलर म्हणजे भारतीय रुपयात सांगायचं झालं तर जवळपास 255 अब्ज रुपयांची गुंतवणूक करणार आहे.


येत्या पाच वर्षात इलेक्ट्रिक लॅन्ड रोव्हर जाग्वारच्या सहा प्रकारच्या कार बाजारात आणण्याचा निश्चय कंपनीने केला आहे. या सर्व कार या इलेक्ट्रिक असतील. जाग्वारच्या लॅन्ड रोव्हर कारला जगातून मोठी मागणी आहे.


इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीसाठी अत्यावश्यक तंत्रज्ञान खूप खर्चिक आहे. हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी जाग्वारकडून 3.5 बिलियन डॉलर म्हणजे तर जवळपास 255 अब्ज रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.


Tesla India Launch Confirmed: टेस्लाची 2021 च्या सुरूवातीला भारतात होणार एन्ट्री, नितीन गडकरींकडून स्पष्ट


जाग्वार कंपनीच्या या निर्णयाने प्रदूषण मुक्तीकडे पाऊल पडणार असून इतरही कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यामुळे प्रोत्साहन मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जगभरात आता इलेक्ट्रिक कार निर्मितीसाठी प्रयत्न होत असून विविध देशांनी त्या संबंधीचे धोरण आखायला सुरुवात केली आहे.


जाग्वार कंपनीच्या या घोषनेनंतर टाटा कंपनीच्या शेअर्समध्ये तीन टक्क्यांची वृद्धी झाल्याचं पहायला मिळालंय. भारतातही इलेक्ट्रिक कार निर्मितीला वेग आला असून सरकारकडून त्यासंबंधी सकारात्मक पावले पडताना दिसत आहेत.


Ola सुरु करणार जगातली सर्वात मोठी इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्टरी, तामिळनाडूत 2400 कोटींची गुंतवणूक