नवी दिल्ली : अमेरिकन इलेक्ट्रिक व्हेईकल अँड क्लीन एनर्जी कंपनी टेस्ला 2021 च्या सुरुवातीस भारतात कार्यरत होणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. सोमवारी इंडियन एक्स्प्रेसच्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे सांगितले. या दरम्यान नितीन गडकरी यांनी देशातील इलेक्ट्रिकल कारच्या गरजेवर चर्चा केली आणि सांगितले की आणखी बऱ्याच भारतीय कंपन्या इलेक्ट्रिकल वाहनांवर काम करत आहेत, ज्यांच्या किंमती कमी करता येतील. तथापि, टेस्ला तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहे, असं गडकरी यांनी म्हटलं.


पुढे गडकरी म्हणाले की, टेस्ला विक्रीसह त्याचे कामकाज सुरू करेल आणि त्यानंतर या कारबद्दल लोकांच्या प्रतिसादाचा विचार करता, ते त्याच्या असेंबल आणि उत्पादनाबद्दल विचार करतील. येत्या 5 वर्षांत भारत नंबर एक चे उत्पादन केंद्र बनणार आहे.


अहवालानुसार, जगातील सर्वात वॅल्यूड ऑटोमोबाईल कॉर्पोरेशनने मार्केट कॅपनुसार पुढील महिन्यात बुकिंग पुन्हा सुरू करण्याचे सांगितले आहे. 2021 मध्ये टेस्ला भारतात लॉन्च होईल. टेस्लाची देखील देशात आर अँड डी सेंटर आणि बॅटरी उत्पादक कंपनी उघडण्याची योजना आहे. तथापि, कंपनीने 2016 मध्येच मॉडेल 3 च्या प्री-बुकिंग सुरू करत भारतात प्रवेश करण्याची योजना केली होती.


जून 2021 पर्यंत त्याचे एस 3 मॉडेल भारतीय बाजारात आणण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी एबीपी न्यूजला दिली.  जानेवारीत भारतात येणार का? या ट्वीटला एलॉन मस्कने उत्तर दिलंय. "जानेवारीत नाही, पण 2021 मध्ये नक्की", असं एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे.





भारत लाँचिंगला उशीर

2016 मध्ये, कंपनीने भारतात येण्याची योजना आखली होती आणि एस 3 मॉडेलसाठी बुकिंग घेणे सुरू केले. परंतु योग्य पायभूत सुविधांच्या अभावामुळे आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या इकोसिस्टममुळे ते होऊ शकले नाही. या विलंबासाठी कंपनीने भारताच्या थेट परकीय गुंतवणूकीच्या (एफडीआय) निकषांना जबाबदार धरले.