Android Users Security Alert : अँड्रॉईड (Android) युजर्स धोक्यात आहेत. यासंदर्भात आयटी मंत्रालयाच्या (IT Ministry) अंतर्गत असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT) ने Android ऑपरेटिंग सिस्टम युजर्ससाठी धोक्याचा इशारा (Security Alert) दिला आहे. हा धोक्याचा इशारा विशेषतः Android 10, Android 11, Android 12 आणि Android 12L या युजर्ससाठी आहे. आयटी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, ऑपरेटिंग सिस्टममध्ये अनेक असुरक्षित घटकांची नोंद झाली आहे. या आढळलेल्या त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स तुमचे डिव्हाइस पूर्णपणे हॅक करू शकतात आणि तुमची संवेदनशील माहिती किंवा सेवा चोरू शकतात.
आयटी तज्ज्ञांनी सांगितले आहे की, ‘अँड्रॉईडमध्ये (Android OS) फ्रेमवर्क कंपोनंट, मीडिया फ्रेमवर्क कंपोनंट, सिस्टम कंपोनंट, कर्नल LTS, MediaTek कंपोनंट, Qualcomm कंपोनंट आणि Qualcomm क्लोज सोर्स कंपोनंटमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. हॅकर्स या त्रुटींचा फायदा घेऊ शकतात. याद्वारे तुमची संवेदनशील माहिती उघड करू शकतात.’
सुरक्षित राहण्यासाठी ‘हे’ काम लवकर करा
तुमचा अँड्राईड फोनमधील तुमची माहिती सुरक्षित राहण्यासाठी CERT-in तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनसाठी उपलब्ध असलेल्या अँड्राईडचं (Android OS0) नवीन व्हर्जन इंस्टॉल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तुम्ही सेटिंग्ज अॅपवर जाऊन तुमच्या स्मार्टफोनसाठी नवीनतम अँड्राईड व्हर्जन तपासू शकता.
काय आहे DoS अटॅक?
DoS (Denial of Service) हल्ला हा एक सायबर हल्ला आहे. अँड्रॉईडमधील त्रुटीचा फायदा घेऊन हॅकर्स तुमचा फोन हॅक करु शकतात. हॅकर्सने जर तुमचा स्मार्टफोन DoS हल्ल्यात हॅक केला तर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन हँग झाल्याने वापरता ही येणार नाही. यावेळी हॅकर्स तुमची संवेदनशील माहिती चोरून तुमचे नुकसान करु शकतात.
महत्त्वाच्या बातम्या :
- ICMR Recruitment 2022 : आयसीएमआरमध्ये नोकरीची संधी, येथे करा अर्ज, जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया
- Netflix : 10 वर्षात पहिल्यांदा नेटफ्लिक्सच्या सब्सक्राइबर्समध्ये मोठी घट, तोट्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कमी करण्याची वेळ
- Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल आजचे दर काय? जाणून घ्या...
- MPSC Exam 2021 : मोठी बातमी! एमपीएससी मुख्य परीक्षेचं प्रवेश प्रमाणपत्र जारी