Netflix Reported Massive Subscriber Loss : नेटफ्लिक्सने (Netflix) मार्केटिंग-संबंधित अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे. कोरोनाकाळात नेटफ्लिक्सचे सब्सक्राइबर्स (Netflix Subscription) सर्वाधिक वाढले. कोरोनाकाळात कंपनीचे सब्सक्राइबर्समध्ये कमालीची वाढ झाली होती. मात्र, 2022 या वर्षाची सुरुवात नेटफ्लिक्ससाठी फारशी चांगली झालेली नाही. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातील नेटफ्लिक्सच्या सब्सक्राइबर्समध्ये मोठी घट झाली आहे. ही घट दशकातील मोठी घट आहे. अमेरिकन ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने अलीकडेच एका अहवालात नोंदवलं आहे की, 2022 च्या पहिल्या तिमाहीत नेटफ्लिक्सने सुमारे दोन लाख सब्सक्राइबर्स आणि तिसऱ्या तिमाहीत दोन दशलक्षाहून अधिक सब्सक्राइबर्स गमावले आहेत.
युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळेही कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे कंपनीने सात लाखपेक्षा जास्त सब्सक्राइबर्स गमावले. युजर्समधील पासवर्ड शेअरिंगही या नुकसानाचे एक कारण असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. त्यामुळे त्याच्या पेड सबस्क्रिप्शनमध्ये फारशी वाढ झालेली नाही. या व्यतिरिक्त नेटफ्लिक्सला डिस्ने प्लस हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ सारख्या इतर OTT प्लॅटफॉर्मसोबत कठोर स्पर्धेचा सामना करावा लागत आहे.
नेटफ्लिक्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण
मिळालेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्स कंपनीच्या शेअर्समध्ये 26 टक्क्यांची घसरण झाली आहे. यानंतर शेअर बाजारातील किंमत सुमारे 40 अब्ज डॉलरने (सुमारे 3,05,320 कोटी रुपये) कमी झाली. कंपनीने अमेरिकेसह कॅनडामधील सुमारे सहा लाख सब्सक्राइबर्स गमावले. जानेवारीमध्ये कंपनीने दोन वर्षांत पहिल्यांदा मासिक सबस्क्रिप्शनमध्ये दरवाढ केली. कंपनीने सांगितले की, सध्याची परिस्थिती पाहता कंपनीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, जगभरात नेटफ्लिक्सचे 222 दशलक्ष सब्सक्राइबर्स आहेत. याव्यतिरिक्त, 100 दशलक्षाहून अधिक सब्सक्राइबर्स त्यांची खाते एकमेकांसोबत शेअर करतात.
नेटफ्लिक्सचे कंपनीच्या मते, पासवर्ड शेअरींगमुळे कंपनीला अधिक तोटा सहन करावा लागत आहे. यूजर्सना आकर्षित करण्यासाठी नेटफ्लिक्सने अनेक देशांमध्ये आपल्या मासिक प्लॅनच्या किमतीही कमी केल्या होत्या. तसेच उत्पन्न वाढवण्यासाठी नेटफ्लिक्सने काही देशांमध्ये सबस्क्रिप्शन प्लॅनच्या किंमतीतही वाढ केली होती. मात्र यामुळे कंपनीचे अधिक नुकसान झाले.
महत्त्वाच्या बातम्या :
- ICMR Recruitment 2022 : आयसीएमआरमध्ये नोकरीची संधी, येथे करा अर्ज, जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया
- MPSC Exam 2021 : मोठी बातमी! एमपीएससी मुख्य परीक्षेचं प्रवेश प्रमाणपत्र जारी
- Afghanistan Blast : दोन बॉम्बस्फोटांनी हादरलं अफगाणिस्तान, 13 जण जखमी तर 9 लोकांचा मृत्यू
- Indonesia Palm Oil Ban : इंडोनेशियाच्या खाद्यतेलाच्या निर्यातीवरील बंदीचा परिणाम, देशात पामतेलाचे दर कडाडले