अवकाशात पोहचल्यानंतर एक-एक उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत कसा सोडण्यात येतो, ते 'इस्त्रो'च्या कॅमेऱ्यांनी टिपलं आहे. उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्याची थरारक प्रक्रिया पाहण्याची संधी 'इस्रो'ने व्हिडिओद्वारे दिली आहे.
एकाचवेळी 104 उपग्रह अवकाशात, 'इस्रो'कडून रशियाचा विक्रम मोडित
PSLV या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा केंद्रावरून बुधवारी सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी PSLV- C37 या उपग्रहांचं अवकाशात प्रक्षेपण झालं.
714 किलो वजनाचा कार्टोसॅट 2 उपग्रह पृथ्वीच्या निरीक्षणासाठी आधी लाँच करण्यात आला, त्यानंतर एकूण 664 किलो वजनाचे 103 उपग्रह अवकाशात झेपावले. 103 उपग्रहांमध्ये भारताच्या दोन नॅनो उपग्रहांसह 96 अमेरिकेचे तर इस्रायल, कझाखिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लँड आणि यूएईचा प्रत्येकी एक उपग्रह आहे.
पाहा व्हिडिओ :
http://www.isro.gov.in/sites/default/files/videos/pslv_c37-on_board.mp4.mp4