एक्स्प्लोर

रस्त्यावरचे खड्डे मोजणारं 'इस्रो'चं मोबाईल अॅप

शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून नाशिक लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांवरच्या खड्ड्यांची वस्तुस्थिती जाणून घेण्याचं काम इस्त्रोने सुरु केलं आहे.

नाशिक : गुगल मॅपवर तुम्ही रस्ते, ट्राफीकची माहिती सहज मिळवता. तशीच भविष्यात कुठल्या रस्त्यावर किती खड्डे आहे, याची माहिती तुम्हाला मोबाईल अॅपवर मिळू शकणार आहे. ‘इस्त्रो’ने रस्त्यांवरच्या खड्ड्यांची माहिती देणारं अॅप बनवण्याचं काम सुरु केलं आहे. देशातला पहिल्या रस्त्यांचं मॅप तयार करण्याचा प्रयोग नाशिकमध्ये इस्त्रोने सुरु केलाय. देशातला पहिला प्रयोग नाशिकमध्ये शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून नाशिक लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांवरच्या खड्ड्यांची वस्तूस्थिती जाणून घेण्याचं काम इस्त्रोने सुरु केलं आहे. सिन्नरमधल्या नायगाव गटातील ब्राम्हणवाडे येथून मोबाईल कॅमेरा अॅपद्वारे रस्त्यांवरील खड्ड्यांच्या सर्वेक्षणाचं काम सुरु करण्यात आलं. पहिल्याच दिवशी 93 किमी रस्त्याचं सर्वेक्षण पूर्ण केलं. देशातला हा पहिलाच प्रयोग असून भविष्यात रस्त्यावरच्या खड्ड्यांची आणि रस्ते कामांची पारदर्शक माहिती या अॅप्लीकेशनद्वारे नागरीकांना, प्रशासनाला सहज मिळेल, असं गोडसेंनी सांगितलं. मोबाईलमधील एक्सीलरोमीटर, गायरोस्कोप आणि कॅमेरा यांच्या माध्यमातून रस्त्यांचं सर्वेक्षण केलं जाईल. यात रस्त्यावर एकूण किती खड्डे आहेत, कुठला खड्डा किती मोठा आहे, किती खोल आहे, याचीही माहिती घेतली जाईल. अॅप्लीकेशन मॅपवर मोठा खड्डा लाल, मध्यम खड्डा निळ्या तर लहान खड्डा इतर रंगात दाखवला जाईल, असं फॉरमॅट तयार करण्यात आलं आहे. सरकारी यंत्रणा अॅपचा वापर करुन घेणार? वाहनचालकांना याचा लाभ होईलच. पण प्रशासनाला, सरकारलाही हे अॅप्लीकेशन फायदेशीर ठरेल. खरंच कुठल्या रस्त्यावर किती खड्डे आहेत, कुठल्या रस्त्यावरच्या खड्ड्यांच्या कामांना परवानगी देणं गरजेचं आहे. काम देण्यापूर्वी आणि पूर्ण झाल्यावर रस्त्यांवरच्या खड्ड्यांची स्थिती काय आहे, याचा सत्य पुरावा या अॅप्लीकेशनच्या माध्यमातून मिळणार असल्याने रस्ते कामांतला भ्रष्टाचारही यामुळं रोखला जाईल. शिवाय वशिल्यावर नाही, तर गरजेनुसार रस्त्यांची कामं केली जातील, असं गोडसेंनी सांगितलं. 'इस्त्रो'च्या अॅप्लीकेशन विभागाचे प्रमुख डॉ.सुरेश बाबू, सौरभ गंगवार यांच्यासह टीम हे अॅप्लीकेशन बनवण्यासाठी नाशकात तळ ठोकून आहे. रस्त्यांवरच्या खड्ड्यांनी सरकारला हतबल केलं असताना आता रस्त्यांच्या पारदर्शक कामांसाठी इस्त्रो मदतीला आता धावून आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपल्या राज्याचा सार्वजनिक बांधकाम या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आवश्यक तिथे काम करेन, अशी अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
Mobile phone prices Rise: सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
Embed widget