IQOO 9T 5G Phone launched : तुम्हाला उत्तम कॅमेरा आणि सर्वात वेगवान बॅटरी असलेला फोन हवा असेल तर 4 ऑगस्टची वाट पाहावी लागणार आहे. Amazon वर लॉन्च केलेला IQOO 9T 5G फोन 4 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा एक प्रीमियम सेगमेंट फोन आहे, ज्याची किंमत 45,999 रुपयांपासून सुरू होते. फोनमध्ये ब्लॅक आणि व्हाइट असे दोन कलर पर्याय आहेत. 10 पॉइंट्समध्ये जाणून घ्या या फोनचे खास फीचर्स काय आहेत.


फोनचे खास फीचर्स काय?


फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल, ज्याचा मुख्य कॅमेरा 50MP GN5 सेन्सरचा आहे.
फोनचा कॅमेरा खास रात्रीच्या फोटोग्राफी आणि व्हिडीओसाठी बनवण्यात आला आहे. रात्रीच्या वेळीही कॅमेऱ्यात छान फोटो मिळतात.
फोनमधील दुसरा कॅमेरा 13MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 12MP प्रो स्पोर्ट मोड कॅमेरा आहे. फोनमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा आहे.
फोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.78 इंच फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले आहे.
फोनमध्ये 4700mAh बॅटरी आहे जी 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. हा फोन फक्त 8 मिनिटात 50% चार्ज होईल
फोनमध्ये 3930MM 2 व्हेपर चेंबर लिक्विड कूलिंग सिस्टम आहे जे गेम दरम्यान फोन गरम होऊ देत नाही.
फोनमध्ये 8GB RAM 128GB स्टोरेज आणि 12GB RAM 256GB स्टोरेज असे दोन पर्याय मिळतील.
फोनची किंमत 45,999 रुपयांपासून सुरू होते. आयसीआयसीआय बँकेच्या कार्डने हा फोन खरेदी केल्यास 4 हजार रुपयांची सूट आहे.
या फोनवर नो कॉस्ट EMI पर्याय नाही ज्यामध्ये तुम्ही 3,834 रुपयांच्या EMI वर फोन खरेदी करू शकता.
फोनवर 7 हजार रुपयांची एक्स्ट्रा कॅशबॅक ऑफरही मिळणार आहे. हा फोन 4 ऑगस्टपासून Amazon वर उपलब्ध होईल.


संबंधित बातम्या


Redmi Note 11 SE लवकरच होणार लॉन्च होईल, फीचर्स झाले लीक


Moto S30 Pro लवकरच लॉन्च होणार, मिळेल 16 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज