WhatsApp New Features: जगात सर्वाधिक वापरला जाणारं मेसेज अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप (WhatsApp). सर्वाधिक वापरलं जाणारं अॅप असल्याने या अॅपमध्येही सतत नवनवे बदल होत असतात. आता एका नवीन बदलाच्या मदतीने तुम्ही स्वत:चा अॅनिमेटेड अवतार अर्थात स्टीकर बनवू शकणार आहात. सध्यातरी व्हॉट्सअॅप वेब (WhatsApp Web)आणि व्हॉट्सअॅप डेस्कटॉप यूजर्स या फिचरचा वापर करु शकतात. तर नेमकं हे फिचर कसं वापरता येईल आणि तुम्ही तुमचं स्टीकर कसं बनवू शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


सध्या व्हॉट्सअॅप वेबवर वापरता येणारं हे फिचर लवकरच मोबाईवरही लॉन्च होणार आहे. सध्यादेखील बीटा वर्जनच्या मदतीने काही मोबाईलवर हे फिचर वापरता येत असलं तरी लवकरच सर्व मोबाईल युजर्ससाठी हे फिचर उपलब्ध होणार आहे. तर मोबाईलवर ही सुविधा येण्याआधी तुम्ही सध्या व्हॉट्सअॅप वेब वापरत असाल तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही स्वत:चं स्टीकर बनवू शकता. अगर आप डेस्कटॉप पर इस फीचर को यूज करना चाहते हैं तो इसके लिए आपको कुछ आसान प्रक्रिया को फॉलो करना होगा.


अशी आहे प्रक्रिया



  • सर्वात आधी व्हॉट्सअॅप वेब डेस्कटॉप अर्थात कंप्यूटरवर ओपन करा.

  • आता कोणालाही मेसेज करताना किबोर्डजवळ एक पेपर क्लिप आयकॉन दिसेल.

  • या आयकॉनवर क्लिक करताच दुसरा ऑप्शन स्टीकरचा दिसेल, त्यावर क्लिक करा.

  • स्टिकर आयकॉनवर क्लिक करताच तुम्हाला फोटो सिलेक्ट करायचा ऑप्शन येईल.

  • त्यानंतर हवा तो फोटो सिलेक्ट करताच तुमच्या समोर एक कस्टमाइजेशन टूल दिसेल.

  • या टूलच्या मदतीने तुम्ही हवा तसा अवतार धारण करुन स्वत:च्या फोटोचं स्टीकर करु शकाल आणि सेव्ह करुन हवं त्याला पाठवू शकाल.


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha