नवी दिल्ली : मूळची चीन येथील मोबाईल उत्पादन कंपनी शाओमी इंडिया भारतात मोठ्या प्रमाणात मोबाईलचे उत्पादन करते. एमआय (MI) नावाने प्रसिद्ध या कंपनीने फोन अनेकांकडे असतात. जवळपास सर्वाधिक वापरली जाणारे या कंपनीचे फोन भारतभरात लोकप्रिय आहेत. पण ही कंपनी आता अडचणीत सापडली असून केंद्र सरकारने त्यांना 663 कोटी रुपये कर चुकवल्याची नोटीस पाठवली आहे. कंपनीने भारतामध्ये चीनमधून मोबाईल फोन आणून ते असेम्बल केले ज्यामुळे व्यापार कराराचा भंग केल्याचा आरोप कंपनीवर करण्यात आला आहे. चीन आणि भारत दरम्यानच्या अलीकडच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे.


मोबाईल फोन तयार करणारी शाओमी टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Xiaomi India) कंपनी कमी मूल्यमापन करून सीमाशुल्क चुकवत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे, शाओमी इंडिया आणि या कंपनीशी करारबद्ध असलेल्या उत्पादकांविरुद्ध भारताच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) तपास सुरू केला. या तपासादरम्यान, विविध कागदपत्रे जप्त करण्यात आली त्यावरून  एका करारांतर्गत, शाओमी इंडिया कंपनी क्वालकॉम यूएसए कंपनीला आणि बीजिंग शाओमी मोबाईल सॉफ्टवेअर कंपनीला परवाना शुल्क पाठवत असल्याचं समोर आलं ज्यामुळे पुढील कारवाई करत त्यांना नोटीस पाठवली गेली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने तपास पूर्ण केल्यानंतर,सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदी अंतर्गत, 1 एप्रिल 2017 ते 30 जून 2020 या कालावधीतील 653 कोटी रुपयांच्या मागणी आणि शुल्काच्या वसुलीसाठी मेसर्स शाओमी टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला तीन कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. 


हे ही वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha