UPI Transactions : भारतात (India) सध्या अनेक लोक आता डिजिटल पेमेंटला (Digital Payment) जास्त महत्त्व देत आहेत. त्यामुळेच डिजिटल पेमेंटचा वापर करणाऱ्यांला आलेख सातत्यानं चढता दिसत आहे. यामुळे भारतात UPI द्वारे पेमेंटची संख्याही दर महिन्याला नवीन उंची गाठत आहे. डिसेंबर 2021 मध्ये यूपीआय ट्रान्जेक्शन (UPI Transaction) ने आपले जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. डिसेंबरमझ्ये युपीआय (UPI) चे 456 कोटी ट्रान्जेक्शन करण्यात आले आहेत. या ट्रान्जेक्शनची एकूण किंमत 8.27 लाख कोटी रुपये असून जी आतापर्यंतची सर्वाधिक किंमत आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये फेस्टिव्ह सीझन दरम्यान, यूपीआयचे 421 कोटी ट्रान्जेक्शन पूर्ण झाले होते. जाणून घेऊया सविस्तर... 


दिसेंबर 2020 च्या तुलनेत लक्षणीय वाढ 


नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या वतीनं दिसेंबर 2021 मध्ये झालेल्या युपीआय ट्रान्जेक्शन (UPI Transaction) बाबत जारी करण्यात आलेल्या आकडेवारीवर नजर टाकली तर ही डिसेंबर 2020 मध्ये झालेल्या ट्रान्जेक्शनच्या तुलनेत 9 टक्क्यांनी अधिक आहे. या ट्रान्जेक्शनच्या किंमतीबाबत बोलायचं तर ही डिसेंबर 2020 च्या तुलनेत 7.6 टक्क्यांहून अधिक आहे. 


संपूर्ण वर्षभरात एवढं ट्रान्जेक्शन


एनपीसीआय (NPCI) च्या आकडेवारीबाबत बोलायचं झालं तर, 2021 मध्ये एकूण 3800 कोटी युपीआय ट्रान्जेक्शन करण्यात आले आहेत. याची एकूण किंमत जवळपास 73 कोटी रुपये होती. एनपीसीआयचा दावा आहे की, जर कमी किंमत असणाऱ्या ऑफलाईन ट्रान्जेक्शनला मंजुरी मिळाली तर दररोज 100 कोटींपर्यंत यूपीआय ट्रान्जेक्शन होऊ शकते. 


गेल्या 4 वर्षांत 70 पटींनी वाढ 


यूपीआय ट्रान्जेक्शनचा ग्राफ गेल्या 4 वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या 4 वर्षांत यूपीआय ट्रान्जेक्शनमध्ये 70 पटींनी वाढ झाली आहे. तर या कालावधीत डेबिट कार्ड (Debit Card) मुळे होणारे ट्रान्जेक्शन कमी झाले आहेत. यूपीआय ट्रान्जेक्शन कार्ड ट्रान्जेक्शनच्या तुलनेत 8 पटींनी अधिक आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा