मुंबई : मोबाईल फोनचा वापर जितका सोयीचा आहे, तितकाच घातकही असल्याचं समोर आलं आहे. मुंबईत एका व्यक्तीच्या खिशात असलेल्या मोबाईल फोनचा अचानक स्फोट झाला.


मोबाईल वापरताना काळजी न घेतल्यास, ते जीवावर बेतू शकते हे या घटनेतून समोर येत आहे. त्यामुळे मोबाईल वापरताना कोणती काळजी घ्यावी याविषयी मोबाईल एक्स्पर्ट नितीन पाटील यांनी काही टिप्स दिल्या आहेत.

मोबाईल स्फोटाची कारणे

बॅटरी खराब झाली किंवा फुगली तर मोबाईलचा स्फोट होऊ शकतो

मोबाईलची बॅटरी ड्युप्लिकेट असेल, तर मोबाईलचा स्फोट होण्याची शक्यता असते

मोबाईल बॅटरी खराब झाल्याचं कसं ओळखाल?

मोबाईल बॅटरीसाठी असलेल्या जागेपेक्षा बॅटरी जास्त फुगणे

बॅटरी वारंवार आणि गरजेपेक्षा जास्त प्रमाणात गरम होणे

बॅटरी बॅकअप कमी होणे, म्हणजे कमी कालावधीत बॅटरी पूर्णपणे उतरणे
खिशातच मोबाईलचा स्फोट, मुंबईत हॉटेलमधील घटना

काय काळजी घ्यावी?

मोबाईलची बॅटरी कायम ओरिजिनलच वापरावी, ड्युप्लिकेट बॅटरी विकत घेणे टाळा

रात्रभर मोबाईल चार्ज करु नये, दोन ते तीन तासच चार्जिंग करावे

पॉवरबँक ऑनलाईन स्वस्त किमतीत मिळतात, मात्र त्या विकत घेणे टाळावे

विश्वसनीय कंपन्यांची पॉवरबँकच विकत घ्यावी

ओरिजिनल बॅटरीचं लाईफ साधारणपणे दीड ते दोन वर्ष असतं, मात्र आजकाल मोबाईलचा वापर वाढला आहे. त्यामुळे साधारण एक वर्षानंतर बॅटरी चेक करावी. अनेक मोबाईलची बॅटरी बाहेर काढून पाहता येत नाही. त्यामुळे सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन किंवा एखाद्या मोबाईल तज्ज्ञाकडून तपासून घ्यावी.