नवी दिल्ली: मोटोरोलाने आज भारतात दोन नवे फोन लाँच केले आहेत.  मोटो G6 आणि G6 प्ले हे दोन फोन आज मध्यरात्रीपासून विक्रीसाठी उपलब्ध असतील. मोटोची G सीरिजमधील फोन हे परवडणारे फोन म्हणून भारतात परिचीत आहेत.


गेल्या काही दिवसांपासून मोबाईल प्रेमींचा ओढा मोटोरोलाकडे वाढला आहे. त्यामुळे कंपनी भारतात नवनवे फोन लाँच केले.

महत्त्वाचं म्हणजे या फोनच्या किमती परवडण्यायोग्य आहेत असा दावा कंपनीने केला आहे.  Moto G6 हा अॅमेझॉनवर 13,999 रुपयांपासून विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर Moto G6 Play हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 11 हजार 999 रुपयांत उपलब्ध करण्यात आला आहे.


Moto G6 आणि Moto G6 Play ची वैशिष्ट्ये

Moto G6


मोटो G6 ची वैशिष्ट्ये म्हणजे याची स्क्रीन 5.7 इंच असेल. हा स्मार्टफोन 3D ग्लास रियर डिझायनसह उपलब्ध असेल.

प्रोसेसर - 1.8GHz ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट

मेमरी - 3GB/32GB आणि  4GB/64GB या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध. 128 जीबी पर्यंत मेमरी वाढवता येते.

कॅमेरा - 12MP+5MP ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सल आहे.

-फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक फीचर

बॅटरी - 3000mAh

Moto G6 Play ची वैशिष्ट्ये

स्क्रीन – 5.7 इंच

रिजॉलेशन - 720x1440

अँड्रॉईड 8.0

प्रोसेसर - 1.4GHz ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 430

मेमरी – 3GB/32GB जी 128 जीबीपर्यंत वाढवता येते.

कॅमेरा – रियर कॅमेरा 13 मेगापिक्सल, सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सल

बॅटरी - 4000mAh दमदार बॅटरी, जी टर्बोचार्जर सपोर्ट करते.

लाईव्ह इवेंट

मोटोरोला आज सकाळी 11.30 वा भव्य शोमध्ये हे दोन फोन लाँच केले. कंपनीने यासाठी दिल्लीत एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यासाठी कंपनीने ट्विटरवर Moto Showtime द्वारे लाईव्ह स्ट्रीमिंगचं नियोजन केलं होतं.