गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या वेबसाईट्सवरील तब्बल वीस लाखांपेक्षा जास्त पासवर्ड चोरी करून ते इंटरनेटवर पब्लिश करण्यात आले आहेत. त्यामध्ये जीमेल, फेसबुक, याहू सारख्या इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंग साईटसचा समावेश आहे.
पासवर्डची चोरी ही काही फक्त एखाद्या देशापुरती नसून संबंध जगातील इंटरनेट यूजर्सचा समावेश या 20 लाख पासवर्डमध्ये आहे.
www.abpmajha.in
पण काही असे उपाय आहेत जेणेकरुन पासवर्ड हॅक होण्याचां धोका कमी होऊ शकतो.
- तुमचा पासवर्ड मोठा असू द्या. पासवर्डमध्ये आठ कॅरेक्टर अवश्य द्या. पण त्यापेक्षा जास्त कॅरेक्टर असणारा पासवर्ड कधीही चांगला ठरेल.
- पासवर्डमध्ये अल्फा न्यूमरीक असावा. यामध्ये एक कॅपिटल अक्षर, एक अंक आणि एखादं स्पेशल कॅरॅक्टर असावं. जसे की - Abcd@1234
- कधीही आपल्या स्वत:चं किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर आधारित पासवर्ड बनवू नका
- पासवर्ड सेट करताना अशा अंकांचा वापर करु नका जे तुमच्या आयुष्याशी निगडीत आहे, उदाहरणार्थ वाढदिवस, जन्मसाल, मोबाईल नंबर इत्यादी.
- कधीही एकच पासवर्ड सर्व अकाऊंटसाठी वापरु नका, बँकिंग पासवर्ड किंवा ट्रेडिंग अकाऊंचा पासवर्ड बनवण्यासाठी विविध नंबरचा उपयोग करा
- आपला पासवर्ड ठराविक काळाने बदलत राहा.
- डिक्शनरीतले शब्द शक्यतो टाळा, असे शब्द हॅक होण्याची शक्यता जास्त
असते. जसे की - Ne@r (Near) वगैरे.
- तुमच्या आवडत्या वाक्याच्या पहिल्या अक्षराचा मिळून पासवर्ड तयार करा. उदाहरणार्थ the quick brown fox jumps over the lazy dog या वाक्याचं पहिलं अक्षर मिळवून tqbfjotld असा पासवर्ड तयार होईल.