राहुल गांधींचं ट्विटर अकाऊण्ट हॅक, अश्लील मेसेज पोस्ट
एबीपी माझा वेब टीम | 30 Nov 2016 09:39 PM (IST)
नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं अधिकृत ट्विटर हँडल हॅक करण्यात आलं आहे. या ट्विटर अकाऊण्टवरुन राहुल गांधी आणि गांधी कुटुंबीयांविषयी वाह्यात मेसेज पोस्ट करण्यात आले आहेत. @OfficeOfRG या राहुल गांधींच्या अधिकृत ट्विटर अकाऊण्टवरुन आठ अश्लील ट्वीट्स पोस्ट करण्यात आले आहेत. त्यानंतर काही ट्वीट्स डिलीट करण्यात आले, तरीही नवीन शिवराळ पोस्ट्स येतच आहेत. काही ट्वीट्समध्ये राहुल गांधींना समलिंगी संबोधण्यात आलं आहे, तर काही ट्वीट्समध्ये गांधी घराण्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. हॅकरने राहुल गांधींचं यूझरनेमही 'रिटार्डेड गांधी' असं ठेवलं होतं. स्क्रीनशॉटही टाकता येणार नाहीत, असे ट्वीट त्यांच्या हँडलवर पोस्ट झाले आहेत. दरम्यान, काँग्रेस प्रवक्त्यांतर्फे राहुल गांधींचं ट्विटर अकाऊण्ट हॅक झाल्याची माहिती देण्यात आली. https://twitter.com/AshokTanwar_INC/status/803985110865309696 https://twitter.com/PTI_News/status/803983031400742916