techfirstpost च्या नव्या रिपोर्टनुसार, अशा क्लोन फोनला ओळखणे सर्वसामान्य यूजर्सना अवघड असते. त्यामुळे आयफोनसारखाच हुबेहुब दिसणाऱ्या काही क्लोन फोनविषयी जाणून घेऊ.
iphone SE च्या नावाने असे क्लोन फोन सध्या बाजारात उपलब्ध आहेत. यूट्यूब चॅनेल EverythingApplePro वर या क्लोन आयफोन SE ची माहिती देण्यात आली आहे. सर्वसामान्य ग्राहकांना ओरिजनल आयफोन SE आणि क्लोन आयफोन ओळखणे अवघड आहे.
सध्या याची बाजारात किंमत ५० डॉलर (३३७८ रुपये) आहे. आयफोन SE ची अॅल्यूमिनिअम मेटल बॉडी असून iOS इंटरफेज देण्यात आलेला आहे. असे स्मार्टफोन म्हणजे मोठा घोटाळा आहे.
आयफोन SE प्रमाणेच अंतरराष्ट्रीय बाजारात Goophone I6s आणि I6sप्लस उपलब्ध आहेत. आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लसचे डमी आहेत. याची किंमत ११९ ड़ॉलर ( आठ हजार रुपये) आणि १४९ डॉलर (दहा हजार रुपये) आहे. तर मुळ आयफोन ६ आणि ६ प्लसची किंमत ४६ हजार आणि ५० हजार आहे.