मुंबई : क्लाऊड स्टोरेज असणारा नेक्स्टबिट रॉबिन स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत 100 डॉलरने (6 हजार 500 रुपये) क

 

आधी ही कपात भारता आणि अमेरिकेतील ग्राहकांसाठी होती. मात्र, कोणत्याही विशिष्ट देशातील ग्राहकांसाठी ही कपात नसल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे जगभरातील सर्व ग्राहकांना नेक्स्टबिट रॉबिन स्मार्टफोन 299 डॉलरना (जवळपास 20 हजार रुपये) उपलब्ध असणार आहे.

 

नेक्स्टबिट रॉबिन स्मार्टफोन गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात लॉन्च करण्यात आला होता. लॉन्चिंगवेळी 399 डॉलर (जवळपास 26 हजार रुपेय) या स्मार्टफोनची किंमत होती. आता थेट 100 डॉलर म्हणजेच जवळपास 6500 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

 

विशेष म्हणजे या नव्या किंमतीत या स्मार्टफोनची फ्री शिपिंग सुविधाही उपलब्ध आहे. अनोख्या डिझाईन्सशिवाय रॉबिन स्मार्टफोनमध्ये यूझर्सना 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज आणि 100 जीबीपर्यंत क्लाऊड स्टोरेजही देण्यात येतं.

 

 नेक्स्टबिट रॉबिन स्मार्टफोनचे फीचर्स:

  • 2 इंच के फुल (1080x1920 पिक्सेल) डिस्प्ले

  • मिंट और मिडनाइट कलर वेरिएंट

  • क्वालकॉम हेक्सा-कोर स्नॅपड्रॅगन 808 प्रोसेसर

  • 3 जीबी रॅम

  • 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज (मायक्रो एसडी सपोर्ट नाही)

  • फिंगरप्रिंट सेन्सर

  • 2680 एमएएच बॅटरी क्षमता

  • यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट

  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा

  • 5 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा

  • अँड्रॉयड मार्शमॅलो 6.0 ऑपरेटिंग सिस्टम