Google For India: प्रत्येक वर्षी होणारा Google For India इव्हेंट आज सुरु होत आहे. हा इव्हेंट तंत्रज्ञानाच्या क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी जितका महत्वाचा आहे तितकाच सर्व यूजर्ससाठी देखील महत्वाचा आहे. कंपनी या इव्हेंटमध्ये भारतासाठी आपले प्लान्स शेअर करत असते. यंदा देखील या कार्यक्रमात असे नवीन प्लॅन्स जारी केले जाणार आहेत. सोबतच कंपनीकडून नवीन फीचर्स देखील जारी होण्याची शक्यता आहे.  



माहितीनुसार गूगलचा हा सातवा Google For India इव्हेंट असणार आहे. कोरोना येण्याआधी हा कार्यक्रम प्रत्यक्ष व्हायचा, मात्र आता हा कार्यक्रम व्हर्चुअल पद्धतीनं होणार आहे. हा कार्यक्रम आपण लाईव्ह स्ट्रीमिंग द्वारे देखील पाहू शकणार आहोत.  


Pixel स्मार्टफोन्स लॉन्च होणार नाहीत


गूगलनं भारतमध्ये Pixel स्मार्टफोन्स लॉन्च केलेले नाहीत. मात्र प्रत्येक वर्षी इव्हेंटमध्ये हा कार्यक्रम ठरलेला असतो. माहितीनुसार  Pixel-6 सीरीज भारतात सध्या तरी लॉन्च केली जाणार नाही. कंपनीनं याबाबत आधीच माहिती दिली आहे. 



सकाळी 10 वाजता सुरु होणार इव्हेंट


याआधीच्या Google For India इव्हेंटमध्ये कंपनीनं भारतात पेमेंट प्लॅटफॉर्म Tez लॉन्च केला होता. त्यानंतर  Google Pay लॉन्च करण्यात आलं होतं. यावेळी कंपनीकडून भारतीय यूजर्स लक्षात घेऊन नवं फीचर्स लॉन्च होण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम आज सकाळी 10 वाजता सुरु होणार आहे.  



कंपनीनं म्हटलं आहे की, आपण सोबत इथवरचा प्रवास केला आहे. यावेळी आम्ही आपल्याला अधिकाधिक प्रोडक्ट्स अपडेट्स, अधिकाधिक  टेक्नोलॉजी इनोवेशन्स आणि भारताच्या उत्तम डिजिटल प्रवासाच्या कमिटमेंटसोबत भेटणार आहोत.