Mobile Use: मोबाईलनं अनेकांचं जीवन बदलून टाकलंय. मोबाईल हा बहुतेक लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलाय. चॅटिंग, कॉलिंग आणि इतर महत्वाच्या कामांसह मोबाईल मनोरंजनाचादेखील साधन बनत चाललंय. घरात असो किंवा बाहेर बहुतेक लोक मोठ्या प्रमाणात मोबाईल वापरताना आपणांस दिसतात. एका अहवालानुसार, कोणत्या देशात मोबाईलचा सर्वाधिक वापर केला जातोय? हे सांगितलं गेलंय. या यादीत इंडोनेशिया पहिल्या स्थानावर आहे. तर, भारताचा क्रमांक कितवा? हे जाणून घेऊयात. 


इंडोनिशिया पहिल्या क्रमांकावर


मोबाईल अॅप एनालिस्ट कंपनी अॅप एनीनं जाहीर केलेल्या एका अहवालानुसार, इंडोनेशियातील लोक दररोज 5.5 तास मोबाईलवर वेळ घालवतात. मोबाईलवर वेळ घालवण्यात इंडोनेशिया अव्वल क्रमांकावर आहे. त्यानंतर ब्राझील 5.4 तासासह दुसऱ्या क्रमाकांवर आहे. तर, दक्षिण कोरिया तिसऱ्या क्रमाकांवर आहे. दक्षिण कोरियात लोक 5 तास मोबाईवर वेळ घालवतात. यानंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतात 4.8 तास लोक मोबाईलवर वेळ घालवतात. भारतानंतर मॅक्सिको पाचव्या क्रमांकावर आहे. मॅक्सिकोमध्ये लोक 4.8 तास मोबाईल वापरतात. 


मागील वर्षाच्या तुलनेत आणखी वाढ


भारतात गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 4 तास इतका होता. मात्र, आता यात 0.8 इतकी वाढ झालीय. ज्यामुळं भारतात दररोज 4.8 तास इतका मोबाईलवर वेळ घातला जातोय, असंही  या अहवालातून समोर येतंय की,


अॅप डाउनलोडही वाढलं


या अहवालात असंही म्हटले आहे की, भारतानं 2021 च्या तिसऱ्या तिमाहीत मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याच्या बाबतीत लक्षणीय वाढ नोंदवलीय. या कालावधीत 28 टक्के वाढ नोंदवण्यात आलीय. या कालावधीत डाउनलोड केलेल्या अॅप्सची एकूण संख्या 24 हजार कोटींवर इतकी आहे. मोबाईल गेमिंगमध्ये भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचंही या अहवालात सांगण्यात आलंय.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha