Google Chrome Alert : कोणतीही माहिती सर्च करण्यासाठी लोक गूगल क्रोम ब्राउजरचा वापर करतात. Forbes च्या रिपोर्टनुसार प्रायव्हसी आणि सिक्यूरिटीसाठी यूझरला त्याच्या फोनमधून क्रोम ब्राउजर डिलीट करावे लागेल. तुम्ही गूगल क्रोमचा वापर करत असाल तर तुमचा पर्सनल डेटा लीक होऊ शकतो. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती- 

Continues below advertisement

Forbes रिपोर्टनुसार फोनमधील डेटा प्राइव्हेट ठेवण्यासाठी यूझरला मोबाईलमधील ब्राउजर डिलीट करावे लागणार आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, ब्राउजरचा वापर केल्यामुळे डेटा लिक होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी फेसबुक कंपनीवर देखील आरोप करण्यात आला होता की, यूझरच्या लोकेशनसोबतच प्रत्येक अॅक्टिव्हीटी आणि डेटा फेसबुक त्यांच्याकडे जमा करत आहेत.   डेस्कटॉपसाठी आहे सेफ ब्राउजर संबंधित असणारा हा अलर्ट केवळ मोबाईल यूझरसाठी आहे. डेस्कटॉप यूझर गूगल क्रोमचा वापर करू शकतात कारण फक्त मोबाईलमधून प्राव्हसी लिक होण्याची शक्यता आहे. Forbes रिपोर्टनुसार, फेसबुक स्वत:च्या कंपनीसाठी डेटा चोरी करत होता तर क्रोम ब्राउजर हे थर्ड पार्टीसाठी यूझरच्या प्रत्येक अॅक्टिव्हीटीकडे लक्ष देत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या जाहिरातीमधून अनेक नोकरी शोधणाऱ्या लोकांना आमिष दाखवून त्यांचा पर्सन डेटा चोरी केला जातो, असा धक्कादायक रिपोर्ट नुकताच समोर आला. propublica (प्रो पब्लिका) वेब साइटच्या वृत्तानुसार,  FBI, फेडरल ट्रेड कमिशन आणि सायबर सुरक्षा फर्म यांनी नोकरीचं आमिष दाखवणाऱ्यांनी खोट्या जाहिरातींबाबत नुकताच खुलासा केला आहे.  आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणार्‍या यू.एस. सीक्रेट सर्व्हिसने पुष्टी केली आहे की, नोकरीचे अमिष दाखवून लोकांचा वैयक्तिक डेटा चोरणाऱ्या जाहिरातींमध्ये सध्या वाढ झाली आहे. 

Continues below advertisement

संबंधित बातम्या :