Safer With Google : गुगलने आता आपल्या इंटरनेट वापरकर्त्यांना अधिक सुरक्षित केलं असून Android स्मार्टफोन मध्ये नवे फिचर्स आणले आहेत, तसेच Google Chrome ब्राउजरमध्ये अपडेट आणत अनेक प्रायव्हसी टूलची घोषणा केली आहे.
गुगलने आपल्या 'Be Internet Awesome' या कॅम्पेनच्या माध्यमातून लहान मुलांना ऑनलाईल सेफ्टीबाबत सजग करण्याचा निर्णय घेतला आहे. या कॅम्पेनच्या माध्यमातून पालक आणि शिक्षकांनाही माहिती देण्यात येणार आहे. सध्या हे कॅम्पेन इंग्रजी आणि हिंदीमध्ये असून लवकरच ते इतर भारतीय भाषांत सुरु करण्यात येणार आहे.
गुगल तो अपना है' कॅम्पेन
गुगलने आठ भाषांमध्ये 'Google toh apna hai' ही मोहीम सुरु केली असून त्यामध्ये यूजर्सना स्कॅमस्टर, फिशिंग वेबसाईट्स आणि इतर ऑनलाईन जोखमींबाबत माहिती देण्यात येणार आहे.
सावधान! तुमच्या मोबाईलमधून ही 8 अॅप्स आताच्या आता डिलिट करा, अन्यथा...
गुगलने Android 12 च्या मध्ये सुरक्षा आणि प्रायव्हसीवर अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. तसेच बऱ्याच काळापासून वापरण्यात न आलेल्या अॅप्सचे रनटाईम परमिशनला रिसेट करण्यात येणार आहे. त्यामुळे यूजर्सच्या डेटाचा दुरुपयोग होणार नाही. अशा अनेक सुविधा गुगलने आपल्या यूजर्सना उपलब्ध करुन दिल्या आहेत ज्यामुळे आपले इंटरनेट अधिक सुरक्षित होणार आहे.
Google Map चं खास फीचर, प्रवासाआधी कळणार टोलनाक्यांची संख्या आणि टोलची रक्कम