Washington : टेक्सास, इंडियाना, वॉशिंग्टन राज्य आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया यांनी Google वर सोमवारी खटला दाखल केला आहे. या खटल्यात असं म्हटलं आहे की, गुगलने वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा गैरवापर करून लोकेशन ट्रॅक केले आहे. वॉशिंग्टन डीसी डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया (DC)अॅटर्नी जनरल, कार्ल रेसीन यांच्या कार्यालयाने एका निवेदनात असं म्हटलं आहे की, “Google ने यूजर्सची दिशाभूल केली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, जर यूजर्सने त्यांचे खाते आणि डिव्हाईस सेटिंग्ज जर बदलली तर त्यांचा पर्सनल डेटावर गुगल नियंत्रण ठेवू शकते. तसेच, गुगल लोकांच्या वैयक्तित माहितीचा डेटा जमा करून त्यातून नफा मिळवत आहे. असा आरोप डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया (DC)अॅटर्नी जनरल, कार्ल रेसीन यांनी केला आहे. 


खरंतर, “लोकेशन डेटा हा Google च्या जाहिरात व्यवसायासाठी महत्त्वाचा आहे. असे असले तरी, वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर केला जाऊ नये, असे वॉशिंग्टन राज्य सरकारचे म्हणणे आहे. 


2018 साली असोसिएटेड प्रेसच्या एका आर्टिकलमध्ये असे सांगण्यात आले होते की, वापरकर्त्यांनी "लोकेशन हिस्ट्री" location history सेटिंग बंद केल्यावरही Google वापरकर्त्यांच्या लोकेशनचा मागोवा घेत आहे. गुगल कंपनीने असा दावा केला आहे की, ते सेटिंग बंद केल्याने कोणतेही लोकेशन ट्रॅक करणे थांबेल. परंतु, प्रत्यक्षात मात्र “वेब आणि अॅप अॅक्टिव्हिटी” नावाची वेगळी सेटिंग असते. जी लोकेशन आणि इतर वैयक्तिक डेटा लॉग करते". 


तर, गुगलचे प्रवक्ते जोस कास्टनेडा यांनी सगळे आरोप फेटाळून आपली भूमिका स्पष्ट करत असं म्हटलं आहे की, वॉशिंग्टन डीसी डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया (DC)अॅटर्नी जनरल, यांनी गुगलच्या सेटिंगबद्दल चुकीचे दावे केले आहेत. जुन्या विधानांवर खटला करणे योग्य नाही. गुगलने प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये वापरकर्त्यांची सुरक्षा कशी राहील, त्यांची वैयक्तिक माहिती कशी लीक होणार नाही. तसेच त्यांचे लोकेशन गैरमार्गाने कसे ट्रॅक करता येणार नाही हाच नेहमी प्रयत्न केला आहे. गुगल ही एक अत्यंत विश्वसनीय कंपनी आहे. त्यामुळे तुम्ही कोणताही गैरसमज न बाळगता याचा वापर करू शकता अशी भूमिका गुगलने मांडली आहे. 


मह्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha