Republic Day 2022 : सध्याच्या या डिजीटल युगात आपण बहुतांश गोष्टी मोबाईलच्या मदतीने करतो. आतातर शिक्षणही ऑनलाईन झालं आहे, त्यामुळे एका क्लिकवर सर्व जग आपल्या बोटापाशी आलं आहे. दरम्यान विविध सणांना एकमेंकाना शुभेच्छा देण्यासाठी देखील WhatsApp चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यात अलीकडे WhatsApp वर आलेल्या स्टीकर्स या पर्यायामुळे शुभेच्छा देताना आणखी भारी वाटतं. अशात आपला 73 वा प्रजासत्ताक दिन एका दिवसावर आला असताना अनेकांना हे WhatsApp स्टीकर्स नेमके कुठून मिळवायचे हे माहित नसतं. तर याबद्दलच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...


देशाच्या 73 व्या प्रजासत्ताक दिन (Republic Day 2022) साजरा करण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे. आतापासूनच सर्वत्र प्रजासत्ताक दिनाचं वातावरण पाहायला मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या विविध पोस्ट सोशल मीडियावर फिरत असून अनेक शासकीय इमारतींना रोषणाई देखील करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे या सेलीब्रेशनवर काही बंधनं असली तरी हा दिवस ऑनलाईन पद्धतीने आपण नक्कीच साजरा करु शकतो. दरम्यान WhatsApp वर एकमेंकाना स्टीकर पाठवण्यासाठी काही सोप्या स्टेप्स तुम्ही करु शकता. यासाठी तुम्हाला काही अॅप्लीकेशन्स डाऊनलोड करावी लागणार आहेत. 


WhatsAppच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाचे (Republic Day stickers) स्टीकर्स कसे डाऊनलोड आणि शेअर कराल?



  • तुम्ही अँड्रॉईड स्मार्टफोन वापरत असाल तर, गुगल प्लेस्टोअरवर किंवा आयफोनच्या अॅप स्टोरवर जाऊन Republic Day Stickers for WhatsApp असं टाईप करा.

  • तुम्हाला इथं अनेक पर्याय दिसून येथील ज्यामधील तुम्हाला आवडेल ते स्टीकर अॅप तुम्ही डाऊनलोड करु शकता.

  • स्टीकरसाठीचं अॅप डाऊनलोड केल्यानंतर ते ओपन केल्यावर तुमच्यासमोर अनेक स्टीकर्सचे पर्याय दिसतील. इथं तुमच्या प्राधान्यानुसार स्टीकरसमोरील ‘+’ आयकॉन दाबत तुम्ही स्टीकर निवडू शकता.

  • स्टीकर अॅड केल्यानंतर ते स्टीकर्स व्हॉट्सअपमध्ये मेसेज सेंड करताना येणाऱ्या किबोर्डजवळील स्माईली आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल. 

  • हे स्टीकर्स दिसल्यानंतर तुम्हाला आवडलेलं स्टीकर हवं त्या व्यक्तीला किंवा ग्रुपमध्ये मेसेजप्रमाणे सेंड करु शकता.


हे ही वाचा -



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha