मुंबई : देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक देशांत लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. अनेक लोक घरातचं होते, कामही वर्क फ्रॉम होम, अशातच कोरोना काळात इंटरनेटच्या वापरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्याचसोबत ऑनलाइन फ्रॉडची प्रकरणही समोर येऊ लागली आहेत. अनेक सोशल मीडिया युजर्स हॅकर्सच्या निशाण्यावर आले आहेत. अनेकदा आपण अनावधानाने अशा काही गोष्टी इंटरनेटवर सर्च करतो, ज्या आपल्यासाठी नुकसानदायी ठरतात. हॅकर्स या सर्व गोष्टींकडे डोळे लावून बसलेले असतात. तुम्ही या गोष्टी सर्च केल्या की, तुम्ही हॅकर्सच्या निशाण्यावर येता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबाबत सांगणार आहोत, ज्या सर्च करणं टाळावं. 


बँकेची माहिती घेऊ नका 


कोरोना काळात ऑनलाईन बँकिंगचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. याचे अनेक फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. ऑनलाईन फ्रॉड करणारे हॅकर्स बँकेप्रमाणेच URL तयार करतात. त्यानंतर आपण जेव्हा त्या बँकेचं नाव टाकतो, त्यावेळी आपण त्यांच्या जाळ्यात अडकतो. ते आपलं अकाउंट हॅक करतात आणि पैसे चोरतात. त्यामुळे बँकेची माहिती गुगलवर सर्च करण टाळा. त्याऐवजी बँकेच्या कोणत्याही कामासाठी बँकेच्या ऑफिशिअल वेबसाईटवरुन माहिती घ्या.  


कस्टमर केअर नंबर 


आपण अनेकदा कस्टमर केअर नंबर गूगलवर सर्च करतो. अनेक लोक ऑनलाईन फ्रॉडची शिकार याच कारणामुळे होतात. हॅकर्स कंपनीची नकली वेबसाईट तयार करुन त्याचा नंबर आणि ईमेल आयडी गुगलवर टाकतात. त्यानंतर आपण त्या क्रमांकावर फोन केल्यानंतर आपल्याकडे आपली माहिती मागतात. त्यानंतर आपल्या अकाउंटमधी रक्कम काढून घेतात. त्यामुळे चुकूनही कोणत्याही कस्टमर केअरचा क्रमांक गुगलवर सर्च करु नका. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुनच कस्टमर केअर क्रमांक घ्यावा.   


Google म्हणजे, डॉक्टर नव्हे... 


अनेक लोक गुगलला सर्वस्व मानतात. कोणत्याही आजाराबाबत अरदी सर्रास गुगलवर सर्च केलं जातं. असं चुकूनही करु नका करु. यामुळे तुमच्या जीवालाही धोका होऊ शकतो. आजाराबाबत गूगलवरुन माहिती घेणं चुकीचं आहे. परंतु, गूगलवर कोणत्याही वेबसाइटवर विश्वास ठेवून आजारावर उपचार करणं किंवा औषधं घेणं नुकसानदायी आहे. 


सरकारी वेबसाईटवरुन योजनांची माहिती घ्या 


केंद्र सरकार डिजिटल इंडियाचा नारा देत आहे. अशातच सरकारी योजनांची माहिती इंटरनेटवर उपलब्ध करुन दिली जात आहे. या योजनाची वेबसाईट असते, तिथून तुम्हाला सर्व माहिती अगदी सहज उपलब्ध होते. नेहमी सायबर क्रिमिनल फ्रॉड सरकारी वेबसाइट सारख्याच दुसऱ्या साईट तयार करतात. यापासूनही लांब राहण्याची गरज असून अधिकृत वेबसाईटवरील माहितीवरच विश्वास ठेवा.