मुंबई : तुम्हालाही ड्रायव्हिंग लायसन्स विसरण्याची सवय आहे का? बऱ्याचदा अनेक लोक आपलं लायसन्स घरी विसरतात आणि गाडी घेऊन बाहेर पडतात. नेमकं त्याचवेळी ट्रॅफिक पोलीस त्यांना गाठतात आणि दंड आकारतात. तुम्ही तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स स्मार्टफोनमध्येही ठेवू शकता. ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्ट कॉपी दाखवूनही तुम्ही दंड भरण्यापासून स्वतःचा बचाव करु शकता. तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची हार्ड कॉपी डिजिटल लॉकरमध्ये ठेवू शकता आणि सॉफ्ट कॉपी फोनमध्ये कुठेही सेव्ह करुन ठेवू शकता. 


जर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स किंवा ड्रायव्हिंग लायसन्स DigiLocker किंवा mParivahan अॅपमध्ये सेव्ह करुन ठेवलं तर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स स्वतःसोबत नाही ठेवलं तरी चालेल. तुम्ही तुमच्या लायसन्सची सॉफ्ट कॉपी ट्रॅफिक पोलिसांना दाखवू शकता. 2018 मधील सरकारी नियमानुसार, जर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स DigiLocker किंवा  mParivahan अॅपमध्ये सेव्ह केलेलं असेल तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स स्वतःसोबत बाळगण्याची गरज नाही. यामुळे तुमचं लायसन्स हरवण्याची किंवा चोरी होण्याची भितीही राहणार नाही. 


आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही आपलं ड्रायव्हिंग लायसन्स फोनमध्ये डाऊनलोड करु शकता आणि गरज भासल्यास ट्रॅफिक पोलिसांनाही दाखवू शकता. 


फोनमध्ये असं डाऊनलोड करा ड्रायविंग लायसन्स 



  • सर्वात आधी तुम्हाला DigiLocker मध्ये अकाउंट ओपन करावं लागेल. 

  • जर तुमचं अकाउंट DigiLocker मध्ये नसेल आणि ओपन करायचं असेल तर तुम्ही आधार कार्डच्या मदतीने साइन अप करु शकता. 

  • त्यासाठी तुम्हाला फोन नंबरची गरज असेल. 

  • DigiLocker मध्ये साइन इन केल्यानंतर सर्च बारमध्ये Driving Licence सर्च करा. 

  • त्यानंतर तुम्ही ज्या राज्यात राहता ते राज्य तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. 

  • त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकावा लागेल. 

  • त्यानंतर Get Document बटनावर क्लिक करा. 

  • आता तुम्ही DigiLocker च्या Issued Documents लिस्टमध्ये जाऊन तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करु शकता किंवा पाहू शकता. 

  • DigiLocker ऐवजी तुम्ही mParivahan अॅपचाही वापर करु शकता. 

  • आता कोणत्याही परिस्थिती तुम्ही तुमच्या फोनमध्ये ड्रायविंग लायसन्स डाऊनलोड करुन दाखवू शकता.