Google Meet : Google ने घोषणा केली आहे की, ते त्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप Google Meet मध्ये पिक्चर-इन-पिक्चर (पीआयपी) देत आहे. हे पिक्चर-इन-पिक्चर इनॅबल करणे खूप सोपे आहे. Google Meet मधील कॉलवर, युझर्स कॉन्फरन्स दरम्यान राईट-क्लिक करू शकतात आणि "ओपन पिक्चर-इन-पिक्चर" निवडू शकतात. असे केल्याने व्हिडिओ कॉल विंडो secondary extension समर्थनाशिवाय लगेच पॉप आउट होईल.
गुगलने पहिल्यांदा मार्चमध्ये या नवीन फीचरबद्दल चर्चा केली होती. हे बदल व्हिडिओ कॉलिंग सेवा गुगल मीटच्या अलीकडील अपडेटमध्ये समाविष्ट केले जाणार आहेत. याव्यतिरिक्त, Google आणखी काही फिचर्स देतो;
कॉलमधून सहभागींना काढून टाकताना होस्ट आणि कोहोस्टला आता तीन पर्याय दिले आहेत
Simply remove the user from the call - या पर्यायासह तुम्ही कॉल दरम्यान थेट वापरकर्त्याला काढू शकता.
Fill out an additional abuse report - याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही वापरकर्त्याला द्वेषयुक्त भाषण किंवा गैरवर्तनासाठी तक्रार करू शकता.
And/or block the user from rejoining - या अंतर्गत तुम्ही वापरकर्त्याला ब्लॉक करू शकता.
मिळालेल्या माहितीनुसार, Google Meet ने युझर्सना PIP आणि मल्टी-पिनिंग सारखे फीचर्स देणे सुरू केले आहे. हे सर्व Google Workspace युझर्ससाठी तसेच जुन्या G Suite Basic, वैयक्तिक Google खाते आणि व्यवसाय युझर्ससाठी उपलब्ध आहे.
महत्वाच्या बातम्या :