Snapchat New Update : स्नॅपचॅट (Snapchat) युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही स्नॅपचॅट वापराचे शौकिन असाल तर ही बातमी नक्की वाचा. आता स्नॅपचॅट वापरण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. कंपनी लवकरच सब्सक्रिप्शन आणण्याच्या विचारात आहे. हा प्लॅन लागू झाल्यास स्नॅपचॅट ॲप वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील. सब्सक्रिप्शन प्लॅन आल्यानंतर युजर्सना सब्सक्रिप्शन विकत घ्यावे लागेल. यामध्ये इतरही अनेक फिटर अपडेट असणार आहेत. कंपनीकडून सध्या याची चाचणी सुरु आहे. 


स्नॅपचॅट प्लस (Snapchat+) सब्सक्रिप्शन प्लॅनची किंमत


मीडिया रिपोर्टनुसार असं समोर आलं आहे की, Snapchat+ च्या एका महिन्याच्या सब्सक्रिप्शन प्लॅनची अंदाजे किंमत 4.59 यूरो ( सुमारे 370 रुपये) असेल, तर युजर्सला 24.99 यूरोमध्ये (अंदाजे 2 हजार रुपये) सहा महिन्यांचा सब्सक्रिप्शन प्लॅन खरेदी करू शकेल. तसेच 45.99 युरो (सुमारे 3,700 रुपये) किंमत टॅगसह एक वर्षासाठी सब्सक्रिप्शन प्लॅन उपलब्ध करून दिली जाईल, असं म्हटलं जात आहे. 


स्नॅपचॅटचे प्रवक्ते लिझ मार्कमन यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे की, 'स्नॅपचॅट त्याच्या सब्सक्रिप्शन प्लॅनवर सध्या काम करत आहे.' मार्कमन यांनी पुढे सांगितलं की, 'सध्या कंपनीकडून Snapchat+ सुरुवातीची चाचणी सुरु आहे. आम्ही आमच्या ग्राहकांसोबत नवीन अपडेट फिचरची माहिती देण्यासाठी उत्सुक आहोत. तसेच आम्ही आमच्या वापरकर्त्यांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.'


पेमेंट कसे होईल?


स्नॅपचॅट युजर्सना प्ले स्टोअर खात्याशी लिंक केले जाईल. ॲप अपडेट होईल. याशिवाय, कंपनी पेड सबस्क्रिप्शन वाढवण्यासाठी वापरकर्त्यांना एका आठवड्याची मोफत चाचणी देऊ शकते. ॲप संशोधक अलेस्सांद्रो पलुझी यांनी ट्विटरवर Snapchat+ साठी अपेक्षित सब्सक्रिप्शन प्लॅनच्या किंमतीची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत सांगितले आहे की, Snapchat+ एक महिन्याच्या सब्सक्रिप्शन प्लॅनची किंमत EURO 4.59 (अंदाजे रुपये 370) आहे, तर 6 महिन्यांच्या सब्सक्रिप्शन प्लॅनची किंमत EURO 24.99 (अंदाजे रु 2,000) आहे. याशिवाय, वार्षिक सब्सक्रिप्शन प्लॅनसाठी EURध 45.99 (सुमारे 3,750 रुपये) मोजावे लागतील.