MacBook Pro : Apple चा नवीन MacBook Pro आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, WWDC 2022 मध्ये लॅपटॉपचे अनावरण करण्यात आले. यामध्ये M2 चे नवीन प्रोसेसर आहे. Apple ने MacBook Pro मध्ये फारसे बदल केले नाहीत, परंतु लॅपटॉपच्या प्रोसेसिंग पॉवरमध्ये सुधारणा केली आहे. ऍपलचा दावा आहे की, M2 MacBook Pro काही अॅप्सवरील M1 MacBook Pro जुन्या पिढीच्या M1 पेक्षा सुमारे 40 टक्के वेगवान आहे. याशिवाय, यात आता 10 कोरचा CPU आहे. नवीन MacBook Pro मध्ये नेमके कोणते बदल करण्यात आले आहेत आणि याची किंमत किती आहे हे जाणून घ्या.
M1 MacBook Pro M2 MacBook Pro पेक्षा किती वेगळा आहे?
ऍपलचा दावा आहे की, M2 MacBook Pro काही अॅप्सवरील M1 MacBook Pro जुन्या जनरेशनच्या M1 पेक्षा सुमारे 40 टक्के वेगवान आहे. M2 MacBook Pro वर गेमिंग कामगिरी 40 टक्के जलद आहे. 13-इंचाचा MacBook Pro आता M2 प्रोसेसरसह येतो, जो पुढील पिढीच्या 8-कोर CPU द्वारे समर्थित आहे. यात ऍपलचा पुढील पिढीचा CPU देखील आहे. यात आता 10-कोर CPU आहे, जो M1 पेक्षा दोन कोर जास्त आहे.
M2 MacBook Pro चे डिस्प्ले तपशील :
M2 MacBook Pro मध्ये IPS टेक्नॉलॉजीसह 13.3-इंचाचा LED बॅकलिट डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 500 nits ब्राइटनेस आणि 2560×1600 पिक्सेल रिझोल्यूशन देतो. M2 MacBook Pro macOS Monterey सह येतो. तथापि, या वर्षाच्या शेवटी यूजर्स macOS Ventura वर अपग्रेड करू शकतील.
M2 MacBook Pro बॅटरी लाइफ :
ऍपलचा दावा आहे की, मॅकबुक प्रो ची बॅटरी 20 तासांपर्यंत चालते. याशिवाय Apple ने M2 MacBook Pro मध्ये टचबार परत आणला आहे. हे 2021 मध्ये लाँच करण्यात आले. हे सुरक्षितता आणि प्रमाणीकरण सुलभ करते.
M2 MacBook Pro किंमत किती?
M2 MacBook Pro 24GB RAM पर्यंत कस्टमाईज केला जाऊ शकतो आणि 2TB SSD सह बसवला जाऊ शकतो. Apple च्या नवीनतम MacBook Pro ची सुरुवातीची किंमत 1,29,900 रुपये आहे. त्याच वेळी, विद्यार्थ्यांसाठी MacBook Pro ची किंमत 1,19,900 रुपयांपासून सुरू होते. ऍपल ऑनलाइन स्टोअर आणि ऍपल अधिकृत साईटद्वारे ग्राहक ते ऑर्डर करू शकतात. M2 MacBook Pro 24 जूनपासून उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या :
- अमेरिकेत Apple स्टोरची युनियन, कर्मचाऱ्यांच्या बहुमतानं प्रस्ताव मंजूर
- Apple MacBook Pro : Apple MacBook Pro ची प्री-बुकिंग 17 जूनपासून सुरू; M2 चिप असलेल्या या लॅपटॉपची खासियत जाणून घ्या
- Apple WWDC 2022 : अॅपलच्या नव्या मॅकबुकसह नवी ऑपरेटिंग सिस्टमही लॉन्च, iOS 16 पासून Watch OS9 सर्व यादी एका क्लिकवर