Google IO 2022 Updates : Google चा Google I/O इव्हेंट सुरू झाला आहे आणि इव्हेंटच्या पहिल्याच दिवशी कंपनीने अनेक सॉफ्टवेअर फीचर्सची घोषणा केली आहे. हे नवीन फिचर्स गुगल मॅप्स, गुगल ट्रान्सलेट, गुगल सर्च आणि इतर अनेक अॅप्ससाठी सादर करण्यात आले आहेत. या नवीन फीचर्सच्या माध्यमातून यूजर्सचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला असावा यासाठी आणले आहेत. 


गूगल भाषांतर (Google Translate)


कंपनीने गुगल ट्रान्सलेटमध्ये 24 नवीन भाषा जोडल्या आहेत. या नवीन भाषांमध्ये संस्कृत, भोजपुरी भाषांसह अन्य 22 भाषांचा समावेश करण्यात आला आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, नवीन भाषांच्या मदतीने कंपनी 300 दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयास आहे. आणि त्याच दृष्टीने हे पाऊल उचलले आहे. 


Google डॉक्स (Google Docs)


Google डॉक्ससाठी एक नवीन फीचर auto summarisation देखील सादर केले आहे. हे फीचर मशीन लर्निंगच्या मदतीने गुगल डॉक्समध्ये समाविष्ट लेखांचे विशिष्ट मुद्दे वाचनीय बनवते. 


Google नकाशे (Google Maps)


कंपनीचे सर्वाधिक लोकप्रिय अॅप गुगल मॅप्सही आता अधिक सोयीचे होणार आहे. यामध्ये कंपनीने Immersive View फीचर जोडले आहे. हे फीचर निवडलेल्या शहरांचे 3D डिजिटली रेंडर केलेले मॉडेल दाखवते. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही फक्त रस्ते आणि बिल्डींगचाच नाही तर फेमस रेस्टॉरंटचा 3D व्ह्यू देखील पाहू शकता. 


YouTube 


गुगलने घोषणा केली आहे की व्हिडिओ प्लॅटफॉर्म YouTube ला आता पूर्वीपेक्षा चांगले कॅप्शन सपोर्ट मिळेल. याशिवाय, यूट्यूबवर कॅप्शन ऑटो-ट्रान्सलेट करण्याची सुविधा देखील असेल.


Google Meet


Google Meet हे आज अतिशय उपयुक्त फीचर झालं आहे आणि ते अधिक चांगले करण्यासाठी कंपनीने ऑटोमेटेड मीटिंग ट्रान्सक्रिप्शनचे वैशिष्ट्य जोडले आहे. या फीचरच्या मदतीने मीटिंगचा संपूर्ण मजकूर गुगल डॉक्समध्ये जोडला जाऊ शकतो. याशिवाय कंपनीने पोर्ट्रेट रिस्टोर फीचर देखील जाहीर केले आहे जे व्हिडिओ गुणवत्ता सुधारते.


Google लेन्स 


गुगल लेन्ससाठी मल्टी सर्च फीचर देखील जाहीर करण्यात आले आहे, ज्याच्या मदतीने गुगल लेन्सवरील चित्रावर क्लिक करून, त्याच्याशी संबंधित तपशील तपासण्यासोबत प्रश्न विचारले जाऊ शकतात. भविष्यात, वापरकर्त्यांना त्यांच्या स्थानिक क्षेत्राबद्दल जाणून घेण्याची सुविधा देखील मिळेल.


महत्वाच्या बातम्या :