Permanently Delete Gmail Account : अनेकदा कामाच्या गरजेसाठी आपण एकाहून अधिक Gmail Account सुरु करतो. पण एका काळानंतर त्याचा वापरच होत नाही. आणि ते खाते तसेच राहते. अशा वेळी तुम्हाला तुमचे अकाऊंट डिलीट करायचे असते. परंतु, अपुऱ्या माहिती अभावी ते डिलीट कसे करावे हे आपल्याला माहित नसते. अशा वेळी आम्ही तुमच्यासाठी जी मेल अकाऊंट (Delete Gmail Account) डिलीट कसे करायचे याची सोपी पद्धत सांगणार आहोत.
तुमचे Gmail अकाऊंट बंद करायचे असल्यास सर्वात आधी तुम्हाला गुगल अकाऊंटमध्ये सेव्ह केलेले सर्व फोटो, ईमेल (E-mail), फाईल्स (file) चेक कराव्या लागतील. यासाठी तुम्हाला त्यांचा बॅकअप घ्यावा लागेल. यासाठी प्रत्येक स्टेप जाणून घ्या..
Google खात्यातून डेटा कसा डाउनलोड करावा ?
सर्वप्रथम तुमच्या ब्राउझरमध्ये https://myaccount.google.com/dashboard ही लिंक उघडा.
आता Download data वर क्लिक करा.
आता तुम्हाला जो डेटा डाउनलोड करायचा आहे तो निवडा.
आता export once पर्याय निवडा आणि फाईलचा प्रकार निवडा.
आता Google अकाऊंट डेटा डाउनलोड करण्यासाठी export वर क्लिक करा.
'ही' आहे gmail अकाऊंट डिलीट करण्याची पद्धत
सर्वप्रथम तुमच्या ब्राउझरमध्ये https://myaccount.google.com वर जा.
आता साइडबारमधून डेटा आणि privacy निवडा.
आता खाली स्क्रोल करा आणि delete your Google account वर क्लिक करा.
आता, तुमचे Google खाते कायमचे हटवण्यासाठी ऑन-स्क्रीन सूचनांचे पालन करा.
महत्वाच्या बातम्या :
- Google Password : लवकरच सर्व पासवर्ड लक्षात ठेवण्याच्या त्रासातून सुटका! गुगल, अॅपल आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीची मोठी घोषणा
- iPhone 14 Specs Revealed : अधिकृत लाँचिंग पूर्वीच आयफोन 14चे फीचर्स लीक, पाहा कसा असणार नवा iPhone 14
- Amazon Summer Sale : अॅमेझॉनच्या 'समर सेल'मध्ये Samsung आणि Redmi वर मिळणार बंपर डिस्काउंट; पाहा खास ऑफर