Google Campaign : सध्या ऑनलाईन, डिजीटल बॅंकिंग किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्थिक व्यवहार करताना फसवणुकीचे किंवा फ्रॉडचे प्रमाण वाढले आहे. या प्रकारला आळा घालण्यासाठी जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन म्हणजेच गुगलने एक मोहीम राबवली आहे. या मोहीमे अंतर्गत गुगल या फसवणुकीला आळा बसविण्याचा प्रयत्न करणार आहे. गुगलने यासाठी 'रहो दो कदम आगे' (Raho Do Kadam Aagey) ही मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या अॅप्सना चांगलाच दणका बसणार आहे.


सध्या देशात आत्महत्येचे प्रमाण वाढले असून या संदर्भात कर्ज देणारे अॅप आणि त्यांचे वसूली एजंट यांचा यामध्ये वाटा असल्याचे उघडकीस आले आहे. याला आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंकेने त्यांच्या विरोधात कडक उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्णयानंतर गुगलने देखील फसवणूक करणाऱ्या अॅप विरोधाक कडक पावले उचलली आहेत. 


वित्तीय संस्था आणि गैर बँकिंग वित्तीय संस्थांना आरबीआयने अशा प्रकारे गैरप्रकार करणाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. त्यानंतर गुगलने रहो दो कदम आगे ही मोहीम राबवली आहे. या मोहीमे अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नियमांमुेळे अशा बोगस आणि बनावट कंपन्यांना आळा बसणार आहे. या माध्यमातून ऑनलाईन कर्ज देणाऱ्या अॅप्सना ग्राहकांबरोबर कोणत्याही प्रकारची मनमानी करता येणार नाही. कारण या अॅप्सवर आता कायद्याची करडी नजर असणार आहे. 






 


गूगलने प्ले स्टोअरवरील अनेक प्रकारच्या कर्ज देणाऱ्या अॅप्लिकेशन्सला तंबी दिली आहे. त्यानुसार, त्यांना कर्ज प्रकरणाचा लेखाजोखा समोर ठेवावा लागेल. त्यांना आता लपवाछपवी करता येणार नाही. ग्राहकांना ज्या वित्तीय संस्था अथवा बँकांच्या मार्फत ते कर्ज उपलब्ध करुन देत आहेत. त्याचीही माहिती त्यांना द्यावी लागणार आहे. आतापर्यंत हे कर्ज अॅप्स ग्राहकांना कोणाकडून कर्ज पुरवठा करण्यात येतो याची माहिती देत नव्हते. मात्र, यापुढे त्यांना तसे करता येणार नाही. 


वित्तीय संस्था, बँकेशी संबंधित माहिती अॅप्सना समोर ठेवावी लागेल. सुरक्षेच्या कारणास्तव हे फिचर लागू करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँकेसोबत झालेल्या अधिकृत बैठकीनंतर गूगलने हा निर्णय घेतला आहे.


वित्तीय सेवांसंदर्भात माहिती देण्यासाठी गूगलने डेडलाईन दिली होती. त्यानुसार, 19 सप्टेंबरपर्यंत डेडलाईन देण्यात आली होती. ज्यांनी नवीन दिशानिर्देशानुसार बदल केले नाहीत, त्या अॅप्सना स्पष्टीकरण द्यावे लागेल. जर त्यांनी बदल केला नाही तर त्यांना प्ले स्टोअरवरुन हटवण्यात येईल. हे अॅप्स वित्तीय संस्था अथवा बँकांकडून स्वस्तात कर्ज मिळवतात आणि इन्स्टंट लोनच्या नावाखाली जास्त व्याजदराने ग्राहकांना उपलब्ध करुन देतात. ही आर्थिक पिळवणूक आहे. तसेच व्याज वसुलीसाठीही ग्राहकांना त्रास देत असल्याने गुगलकडून ही पावले उचलण्यात आली आहेत. 


महत्वाच्या बातम्या :