Apple Announced festival Season : सध्याच्या घडीला सर्वांत आघाडीचा स्मार्टफोन म्हटलं तर अॅपल कंपनीचे आयफोन (Apple iPhone). जगभरात कोट्यवधी व्यक्ती हा फोन वापरतात. अगदी तरुणाईपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वचाच पसंदीचा आयफोन घेणं अनेकांचं स्वप्नही असतं. इतर फोन्सच्या किंमतीत महागडा हा फोन अलीकडे मात्र फिल्पकार्ट, अॅमेझॉन या कंपन्यांच्या साईटवरुन ऑफर्समध्ये स्वस्तात विकत घेता येत आहे. पण आता स्वत: अॅपल कंपनीने त्यांच्या अधिकृत साईटवरही सेल जाहीर केला आहे. भारतात सध्या सणासुदीचं वातावरण असल्याने 26 सप्टेंबरपासून फेस्टिव ऑफर अॅपलने जाहीर केली असून त्यांनी केलेलं अधिकृत ट्वीट तुफान व्हायरल होत आहे.


Apple चं अधिकृत ट्वीट






देशभरात सध्या उत्साहाचं वातावरण आहे. नवरात्री काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रात घटस्थापनेनंतर नऊ दिवस त्यानंतर दसऱ्याला अगदी धुमधाम असते. तसंच गुजरातमध्येही नवरात्रीचा उत्साह अफलातून असतो. तिकडे पश्चिम बंगालमध्येही दुर्गापुजेच्या मूहर्तावर सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतं. याच सर्व पार्श्वभूमीवर अॅपलनं फेस्टिव ऑफर जाहीर केल्या आहेत. आयफोन 14 लॉन्चनंतर नुकतच फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन यांच्या सेलमध्ये आयफोन 13, 12, 11 अशा व्हेरियंटची किंमत बरीच कमी झाली होती. अजूनही काही ऑफर असून ज्यांची आयफोन घेण्याची संधी हुकली आहे, त्यांच्यासाठी अॅपलनं ही खास ऑफर आणली आहे. यावेळी नेमकी फोनची किंमत किती कमी होणार? तसंच कोणकोणत्या ऑफर असणार? याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही...26 सप्टेंबर रोजीच नेमकी ऑफर काय असेल हे कळणार आहे. विशेष म्हणजे आयफोन 14 ही स्वस्तात मिळण्याची शक्यता असल्याने अनेकांच्या नजरा या ऑफरकडे लागून आहेत.


आयफोन 14 पाच रंगांमध्ये सादर 


अॅपलचा दावा आहे की, आयफोन 14 हा सर्वात फास्ट फोन आहे. Apple iPhone 14 पाच रंगात लॉन्च करण्यात आलाआहे. यामध्ये मिडनाईट, स्टारलाइट, ब्लू, पर्पल आणि रेड यांचा समावेश आहे. Apple ने iPhone 14 मध्ये सिम कार्ड स्लॉट ठेवलेला नाही. तो काढण्यात आला आहे. मात्र कंपनीने हे फक्त अमेरिकेत लॉन्च केलेल्या फोनसाठी केलं आहे. भारतात सिम कार्ड स्लॉट दिला जाऊ शकतो.




 



iPhone 14 स्पेसिफिकेशन 



  • आयफोन 14 स्क्रीन डिस्प्ले 6.1 इंच तर आयफोन 14 प्लस स्क्रीन डिस्प्ले 6.7 इंचाचा आहे. 

  • दोन्ही आयफोन A15 बायोनिक चिपसेटसोबत उपलब्ध आहे.

  • आयफोन 14 - फ्रंट कॅमेरा आणि मेन कॅमेरा - 12 एमपीचा देण्यात आला आहे.

  • नवीन फोन 5जी आणि ई-सीमसोबत उपलब्ध आहे.

  • कार क्रॅश डिटेक्शन फीचर उपलब्ध मिळणार.


संबंधित बातम्या :