Gmail New Look : जीमेल (Gmail) वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच तुम्हाला जीमेलचा नवा लूक पाहायला मिळणार आहे. गुगल (Google) ने घोषणा केली आहे की लवकरच Gmail चे नवीन डिझाईन येणार आहे. नवीन डिझाईन कंपनीच्या Google Workspace च्या नवीन प्लॅन अंतर्गत आहे, ज्यामध्ये Gmail ला गुगल चॅट (Google Chat), मीट (Google Meet) आणि स्पेसेस (Google Spaces) एकाच विंडोमध्ये पाहता येणार आहेत.
फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होऊ शकते चाचणी
कंपनीच्या मते, जीमेलचा नवीन लूक म्हणजेच जीमेल इंटिग्रेटेड व्ह्यू Q2 2022 वर्षात रिलीज केला जाईल. युजर्ससाठी हा नवा इंटरफेस या वर्षी जूनपूर्वी रिलीज होईल. 8 फेब्रुवारीपासून गुगल या संकल्पनेची चाचणी सुरू करणार आहे.
नवीन इंटरफेसमध्ये काय खास असेल?
रिपोर्टनुसार, नवीन लूकमध्ये यूजर्सना एकाच पेजवर मेल, चॅट (Google Chat), स्पेसेस आणि मीट (Google Meet) चे टॅब दिसतील. त्याच विंडोमध्ये असताना तुम्ही यापैकी कोणत्याही एक पर्याय निवडू शकता. तुम्ही एका वेळी फक्त एकच टॅब वापरण्यास सक्षम असाल, मात्र यावेळी तुम्हाला दुसऱ्या पर्यायावर आलेली नोटिफिकेशन ब्लिंक होताना दिसेल. आत्तापर्यंत नवीन लेआऊटबद्दल समोर आलेल्या माहितीनुसार तुम्हाला हे सर्व टॅब डाव्या बाजूला दिसतील. या नवीन लूकची घोषणा कंपनीने सप्टेंबर 2021 मध्ये केली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Tesla Car : थांबायला सांगितलं तरी न ऐकणाऱ्या ड्रायव्हरलेस टेस्ला कार परत बोलावणार
- Jumbo Mega Block : या वीकेंडचे नियोजन आधीच करुन घ्या... मध्य रेल्वेवर 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक
- Viral Song : 'बदाम... बदाम... कच्चा बदाम'वर थिरकले सेलिब्रिटी; गाणं सोशल मीडियावर व्हायरल, खरा गायक कोण?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha