Kacha Badam Song : सध्या 'पुष्पा' चित्रपटाच्या डायलॉग्ससह सोशल मीडियावर (Social Media) एका गाण्याने धुमाकूळ घातला आहे. हे गाणं आहे 'कच्चा बदाम'. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येक जण 'कच्चा बदाम'वर नाचताना दिसतो. या गाण्यावर भन्नाट रिल्स आणि व्हिडीओ बनत आहेत. तुम्ही इंस्टाग्रामवर स्क्रोल केल्यास, प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या रीलमध्ये 'कच्चा बदाम' गाणं ऐकू येईल. आता सर्वजण या गाण्यावर नाचत आहेत पण हे गाणे काय आहे? कोणत्या भाषेत? हे अचानक कुठून आले? आणि ते कोणी गायले? याबद्दल तुम्हाला आम्ही माहिती देणार आहोत.

खरंतर आधी 'कच्चा बदाम' हे गाणं नव्हतं. एका शेंगदाणे विक्रेत्याने शेंगदाणे विकताना 'बदाम... बदाम... कच्चा बदाम' या ओळींचा वापर केला. भुवन बडायकर असे या शेंगदाणा विक्रेत्याचे नाव आहे. भुवन बडायकर हे पश्चिम बंगालमधील कुरलजुरी या गावचे रहिवासी आहेत. भुवन बडायकर अशी गाणी म्हणत शेंगदाणे विकायचे. आता तुम्ही विचार करत असाल की बदामाचा आणि शेंगदाण्यांचा काय संबंध? तर शेंगदाण्याला पश्चिम बंगालमध्ये 'कच्चा बदाम' म्हणतात. 

भुवन शेंगदाणे विकताना 'बदाम... बदाम... कच्चा बदाम' असं त्याच्या शैलीमध्ये गायचा. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी यावर रिल्स आणि व्हिडीओही बनवले. त्यानंतर या गाण्याचं आता रॅप वर्जनमध्ये गाणं आलं आहे. तेही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha