मुंबई : आयआयटीच्या चौथ्या ई-यंत्रा रोबोटिक्स इव्हेंटला आजपासून सुरवात झाली आहे. देशभरातून आलेल्या 300 रोबोटमधून मानवाच्या दृष्टीने मदतगार होतील, असे महत्वाचे अवघे 16 रोबोट या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत.


नवी मुंबईतील रामराव आदिक इस्टिट्युटच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला 'ऑटो नेव्हीगेटिव्ह रोबोट' म्हणजे याला रिमोटच्या साह्याने न चालवता हा स्वतः आपला रस्ता शोधू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजियन्स हा उत्कृष्ट नमुना आहे.

दुसरा रोबोट 'एरिअल क्रॉप हेल्थ मॉनिटरिंग रोबोट' हा आहे. हा रोबोट ड्रोनच्या माध्यमातून शॉर्टस घेऊन पिकांच्या आरोग्याबद्दल माहिती देतो. हा रोबोट अमरावतीच्या राम मेघे कॉलेजच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवला आहे.

रोबोट तयार करण्यासाठी कॉलेजच्या 5 जणांच्या टीमने एकत्रित काम केलं. औरंगाबादच्या सीएसएमएस कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला आणि पर्यावरणच्या दृष्टीने महत्वाचा रोबोट 'पेपर बॅग मॅन्युफॅक्चरिंग रोबोट' हा रोबोट प्लास्टिक बॅग ऐवजी कागदी बॅग बनवतो.

यासोबतच प्रदर्शनात संकटकाळी मदत करणारा पुण्याच्या पीआयसीटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला 'सॅव्हीयर ऑटोमॅटेड रेस्क्यू रोबोट'. हा भूकंप आणि दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अगदी जवानासारखा रेस्क्यू ऑपरेशनच्या काळात उपयोगात येणारा रोबोट आहे.

सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू बनलेला कोल्हापूरच्या जे.जे. मगदूम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलेला 'ओरगन ट्रान्सफर बाय युसिंग ड्रोन' हा रोबोट अगदी कमी वेळात रुग्णांपर्यंत ऑर्गन ट्रान्सफर करायचं काम हा रोबोट करतो. ते सुद्धा ड्रोनच्या मदतीने.

याशिवाय विमान प्रवाशी लोकांना मदत करणारा चेंबुरच्या विवेकानंद कॉलेजचा 'प्रवास साथी' रोबोट, तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांचा 'ग्लास क्लीनिंग रोबोट' असे जवळपास मानवाच्या दृष्टीने महत्वाचे रोबोट या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत.

मानवाच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने उपयोगी असलेले रोबोट आपण या प्रदर्शनात आहेत. खरं तर कॉलेजच्या तरुणांनी जे कल्पक विचारांनी या रोबोटची निर्मिती केली. यातून खऱ्या अर्थाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच दर्शन आपल्याला या माध्यमातून होतं आहे.